पनवेल जेष्ठ नागरिक संघाच्या वर्षा सहलीने जेष्ठांचा आनंद द्विगुणीत...
पनवेल जेष्ठ नागरिक संघाच्या वर्षा सहलीचा जेष्ठांनी लुटला मनमुराद आनंद..

पनवेल / प्रतिनिधी : -
पनवेल जेष्ठ नागरिक संघाची दि.१९ ऑगस्ट रोजी बी.के.रिसाॅर्ट वाॅटर पार्क शिळफाटा येथे वर्षा सहल आयोजित करण्यात आली होती. या सहलीचा जवळपास १०० ज्येष्ठांनी आनंद घेतला. 
पाण्यातील राईडस, व्हेव पूल, कारंजे, रेन डान्स, ट्युब राईडस अशा अनेक प्रकारच्या अॅक्टीवीटीजचा सर्वांनी मनमुराद आनंद घेतला. 
तसेच उत्तम प्रकारचा सकाळच्या नाश्ताचा आस्वाद घेऊन, नेहमी प्रमाणे बुधवारची साप्ताहिक सभा देखील सहलीचे स्थळी घेण्यात आली, वाढदिवस पण साजरे केले. 
यावेळी गाणी, कविता, किस्से सभासदांनी सादर केले. बी के  रिसाॅर्ट वाॅटर पार्क यांचे मॅनेजर आणि स्टाफ यांचा संघातर्फे सन्मान करण्यात आला. बीके  रिसाॅर्ट वाॅटर पार्क यांचे व्यवस्थापनाकडून जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयवंत गुजर, उपाध्यक्ष माधुरी गोसावी, सचिव सुनील खेडेकेर व सभासद मुकादम यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. संघाचे सचिव सुनील खेडेकर उपाध्यक्ष माधुरी गोसावी यांनी सहलीची मेहनत घेऊन उत्तमरित्या नियोजन केले.
Comments