मनिषा सुनील भोपतराव यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी संपन्न ..
मनिषा सुनील भोपतराव यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी संपन्न 

पनवेल : 
सौ.मनिषा भोपतराव यांचा वाढदिवस ८ऑगस्ट रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी संपन्न झाला.मनिषा या एल.आय.सी. मध्ये अधिकारी आहेत. दरवर्षी वाढदिवसानिमित्त त्या सामाजिक, समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. 
या वर्षी त्यांचा वाढदिवस बालग्राम खांदा काॅलनी, नविन पनवेल येथील अनाथ मुलांबरोबर साजरा केला.
अनाथ आश्रमातील ४० मुलांसाठी जेवण व खाऊचे वाटप तसेच इतर साहित्य यावेळी भेट देण्यात आले. 

या कार्यक्रमास पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक डॉ.अरूणकुमार भगत , नरेश पाटील सर, ऍड आशाताई भगत, भारती पाटील, आदी मंडळी उपस्थित होती. 
Comments