पनवेल महापालिका प्रभाग क्रं १४ मध्ये नगरसेविका आर्या प्रविण जाधव यांनी करून घेतली नाले सफाई...
पनवेल / प्रतिनिधी : -
जून महिन्यात पावसाचे आगमन होण्यापूर्वी नालेसफाई होणे आवश्यक असते, नाहीतर नाले तुंबून घरांमध्ये पाणी जाण्याचा संभव असतो त्या दृष्टीकोनातून नगरसेविका आर्या प्रवीण जाधव यांनी त्यांच्या पनवेल महापालिका प्रभाग क्रं १४ मध्ये बंदर रोड, भुसार मोहल्ला या ठिकाणी स्वतः उभे राहून नाले सफाई करून घेतली.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख प्रवीण जाधव,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते, यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.