घरातील किरकोळ अपघाताने पार्कीन्सनग्रस्त महिलेच्या पाठीचा कणा झााल फ्रॅक्चर; वेळीच उपचारांमुळे ती पुन्हा चालु लागली
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये प्रगत काइफोप्लास्टीमुळे ६८ वर्षाय रुग्णाला मिळाले नवे आयुष्य*
नवी मुंबई / : घरात पडल्यामुळे पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झालेल्या ६८ वर्षीय महिलेला अत्याधुनिक आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह ‘काइफोप्लास्टी’ उपचारामुळे केवळ काही दिवसांत पुर्ववत चालता येऊ लागले असून रुग्णाचा आत्मविश्वासही वाढला आहे. खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन डॉ. हरीश नाईक यांच्या नेतृत्वाखाली टीमने या रुग्णावर यशस्वी उपचार केले. रुग्णाला पूर्वीपासूनच उच्च रक्तदाब, इस्केमिक हार्ट डिसीज (पूर्वी स्टेंट बसविला होता), पार्किन्सन आजार आणि हायपोथायरॉईडीझम अशा अनेक आरोग्य समस्या होत्या. त्यामुळे हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे आणि आव्हानात्मत होते. मात्र वेळीच निदान आणि प्रगत उपचारांमुळे रुग्ण लवकर बरी झाली आणि पुन्हा हालचाल करू लागली.
*खारघर येथे राहणाऱ्या श्रीमती मीना पवार (नाव बदलले आहे)** या पार्किन्सन आणि हायपोथायरॉईडीझमसारख्या दीर्घकालीन आजारांशी झुंज देत होत्या. या आजारांमुळे त्यांच्या शारीरीक ऊर्जेवर , संतुलनावर आणि दैनंदिन हालचालींवर परिणाम झाला होता. मात्र २३ फेब्रुवारी २०२६ रोजी घरातील किरकोळ अपघाताने त्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला. त्यांना कंबरेखालील भागात तीव्र वेदना सुरू झाल्या आणि दैनंदिन हालचाली करणेही कठीण झाले. त्यानंतर त्यांनी तातडीने मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारांसाठी धाव घेतली.
*खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन डॉ. हरीश नाईक यांनी सांगितले,* प्राथमिक तपासणीत मणक्याजवळ वेदना आणि पाठीच्या कण्याच्या हालचालींवर मर्यादा आली, मात्र न्यूरोलॉजिकल कार्य सामान्य होते. पुढील तपासणीत मणक्याचे ‘ऑस्टिओपोरोसिसमुळे झालेले कॉम्प्रेशन फ्रॅक्चर’ याचे
निदान झाले. वृद्धांमध्ये हाडे ठिसूळ झाल्यामुळे अशा प्रकारचे फ्रॅक्चर सामान्यपणे आढळून येते. मात्र योग्य वेळी उपचार न झाल्यास हालचालींवर आणि जीवनमानावर गंभीर परिणाम होऊ शकतो. सुरुवातीच्या उपचारांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आम्ही ‘ बलून व्हर्टिब्रोप्लास्टी (काइफोप्लास्टी)’ करण्याचा निर्णय घेतला.
*ते पुढे सांगतात की,* या प्रक्रियेत फ्रॅक्चर झालेल्या मणक्यात एक छोटा बलून घालून त्याची उंची पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यानंतर त्या जागेत ‘बोन सिमेंट’ भरून मणका स्थिर केला जातो. यामुळे वेदना त्वरीत कमी होतात आणि रुग्णाला लवकर चालता येते. ही प्रक्रिया मिनिमली इन्व्हेसिव्ह प्रक्रिया असल्यामुळे वयोवृद्ध रुग्णांसाठी सुरक्षित ठरते. बहुतांश रुग्णांना २४ ते ४८ तासांत वेदनांपासून आराम मिळतो. तसेच दीर्घकाळ वेदनाशामक औषधांवरील अवलंबित्व कमी होते.
ही प्रक्रिया इमेजिंग मार्गदर्शनाखाली ‘ट्रान्सपेडिक्युलर’ पद्धतीने करण्यात आली. डी १२ मणक्यात काळजीपूर्वक बलून घालून जागा तयार करण्यात आली आणि मणक्याची उंची अंशतः पुनर्स्थापित करण्यात आली. त्यानंतर त्या जागेत बोन सिमेंट भरून फ्रॅक्चर झालेले हाड स्थिर करण्यात आले. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत अचूकपणे पार पडली.
वृद्ध रुग्णांसाठी अशा प्रक्रियेनंतर शक्य तितक्या लवकर हालचाल सुरू करणे महत्त्वाचे असते, कारण दीर्घकाळ बेडरेस्टमुळे स्नायूंना कमकुवतपणा येतो, संसर्ग किंवा रक्ताच्या गाठी तयार होणे अशा गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. या रुग्णाने उपचारांना चांगला प्रतिसाद दिला. इतरांच्या मदतीने चालणे सुरू केले आणि अल्पावधीतच प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून आली. योग्य काळजी घेतल्यास अशाप्रकारचे रुग्ण पुन्हा नियमित जीवन जगू शकतात, *असेही डॉ. नाईक यांनी सांगितले.*
उपचारानंतर रुग्णाला वॉर्डमध्ये हलवून आयव्ही औषधे, द्रवपदार्थ आणि हळूहळू हलका आहार सुरू करण्यात आला. ‘टेलर ब्रेस’च्या सहाय्याने रुग्णाने चालण्यास सुरुवात केली. प्रकृती स्थिरावल्याने आणि उपचारांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्यांना २७ फेब्रुवारी २०२६ रोजी घरी सोडण्यात आले. त्यानंतर तज्ज्ञांनी दिलेली औषधं न वगळता नियमित औषधांचे सेवन करणे, डॉक्टरांचा सल्ल्याशिवाय औषधांचे सेवन बंद न करणे, नियमित फॉलो-अप करणे आणि तेलकट व चरबीयुक्त अन्न पदार्थ टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पार्किन्सनमुळे आधीच आयुष्य कठीण झाले होते, त्यात पडल्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली. वेदनांशिवाय चालता येईल अशी आशाच उरली नव्हती. पण याठिकाणी मिळालेल्या अचूक उपचारांमुळे आणि डॉक्टरांच्या पण प्रयत्नांनी मला पुन्हा चालण्यासाठी आत्मविश्वास मिळाला. मी डॉ. नाईक आणि त्यांच्या टीमची आभारी आहे, *असे रुग्ण श्रीमती मीना पवार यांनी व्यक्त केली.*
या प्रकरणातून वृद्धांमध्ये पाठीच्या कण्याच्या फ्रॅक्चरच्या उपचारासाठी वेळीच उपचार आणि प्रगत मिनिमली इन्व्हेसिव्ह तंत्रज्ञान किती महत्त्वाचे आहे, हे अधोरेखित होते. योग्य वेळी आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार मिळाल्यास गंभीर गुंतागुंत असलेल्या रुग्णांनाही चांगले परिणाम मिळू शकतात आणि त्यांचे स्वावलंबन पुन्हा प्राप्त होऊ शकते, *असे मेडिकव्हर हॉस्पिटल, नवी मुंबईचे केंद्र प्रमुख संदीप जोशी यांनी स्पष्ट केले.*