मयूर गुरुनाथ तांबडे द ग्रेट पत्रकारिता आयकॉन अवॉर्ड्सने सन्मानित
नवीन पनवेल : पनवेल येथील पत्रकार मयूर तांबडे यांना द ग्रेट पत्रकारिता आयकॉन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. आई फाउंडेशन, समृद्धी फाउंडेशन, आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांच्या वतीने तीन एप्रिल रोजी महाड येथे स्वराज्य भूमी, रायगड गौरव संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकारिता क्षेत्रात प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि ध्येयाने व धाडसाने केलेल्या कार्याची दखल घेत मयूर तांबडे याांांना हा पुरस्कार देण्यात आला.
पत्रकार मयूर तांबडे यांनी गेल्या तेरा वर्षांत अनेक वृत्तपत्रात काम केले असून पनवेल आणि ग्रामीण भागातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी पत्रकारिता सोबतच अनेक सामाजिक उपक्रम देखील राबवले आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना यापूर्वी देखील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. प्रशासनावर त्यांची मजबूत पकड आहे. कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक गोरगरिबांना मदतीचे वाटप केले. त्यावेळी त्यांना अनेक दानशूर व्यक्तींनी देखील मदत केली. दिलासा फाउंडेशन, पनवेलच्या माध्यमातून अनेकांना सायकल वाटप केले. पनवेल-नवी मुंबई पत्रकार संघाच्या माध्यमातून गरीब गरजूंना सायकल वाटप तसेच शिलाई मशीनचे वाटप केले. पत्रकार मयूर तांबडे यांच्या माध्यमातून वृक्षारोपण, वह्या वाटप, पत्रकारांना विमा पॉलिसी वाटप करण्यात आले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाड येथे झालेल्या कार्यक्रमात मयूर तांबडे यांना द ग्रेट पत्रकारिता आयकॉन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. यावेळी अभिनेते संतोष पाटील, संचालक उदय वाघेरे, आई फाउंडेशनचे विनोद मोरे, समृद्धी पब्लिकेशन्सचे बी एन खरात, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण अध्यक्ष शैलेश पालकर, रायगड अध्यक्ष राकेश खराडे, उद्योजक मनोज आंग्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मयूर तांबडे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे शासकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.