मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये पहिली सर्व्हायकल डिस्क रिप्लेसमेंट यशस्वी ; स्पाइन उपचारात गाठला नवा टप्पा..
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये पहिली सर्व्हायकल डिस्क रिप्लेसमेंट यशस्वी ; स्पाइन उपचारात गाठला नवा टप्पा..
 नवी मुंबई / पनवेल वैभव : -
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच एका ३८ वर्षीय महिलेवर सर्व्हायकल डिस्क रिप्लेसमेंट (Cervical Disc Replacement) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आहे. स्पाइन केअर क्षेत्रात हा एक महत्त्वाचा आणि एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. या प्रगत शस्त्रक्रियेमुळे सर्व्हायकल डिस्क संबंधित गंभीर आजारांवरील उपचारांना नवी दिशा मिळाली आहे.

या महिला रुग्णाला C6–C7 डिस्क प्रोलॅप्स( मणक्यांमधील गादी सरकणे) आणि उजव्या हातापर्यंत या वेदना पसरल्या होत्या . ऐके दिवशी रुग्णाला इतका त्रास होत होता की, वेदना कमी करण्यासाठी तिला आपला हात सतत वर उचलून ठेवावा लागत होता. आयव्ही, वेदनाशामक औषधं, स्टिरॉइड्स आणि फेंटॅनाइल पॅच देऊनही तिची लक्षणांमध्ये सुधारणा होत नव्हती आणि त्या वेगाने वाढत चालल्या होत्या. आता, रुग्ण पूर्णपणे बरी झाली आहे आणि ती सहजपणे व आत्मविश्वासाने आपल्या दैनंदिन कामांवर परतली आहे.

 *खारघर येथे राहणाऱ्या श्रीमती सुलोचना(नाव बदलले आहे)* या अनेक वर्षांपासून मानेच्या वेदनांनी त्रस्त होत्या. अचानक, हा किरकोळ त्रास वेगाने असह्य वेदनांमध्ये बदलला, ज्यामुळे रुग्णाचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले. हात उचलणे, वस्तू धरणे किंवा मान वळवणे यांसारख्या साध्या हालचाली देखील अत्यंत वेदनादायक वाटु लागल्या. रुग्ण शांतपणे झोपू शकत नव्हते, काम करू शकत नव्हते आणि सततच्या वेदनेमुळे स्वतःची काळजी घेणे देखील अशक्य होते. त्या सतत हात वर उचललेल्या अवस्थेतच ओपीडीमध्ये आली त्यांना त्यांचा हात खाली ठेवताच येत नव्हता. त्यांच्या वेदना इतक्या तीव्र होत्या की त्या एमआरआयसाठी झोपूही शकत नव्हत्या, त्यामुळे डॉक्टरांना देखील त्यांचा स्कॅन अर्धवट थांबवावा लागला. भूलतज्ज्ञांच्या देखरेखीखाली भूल देऊन पुन्हा एमआरआय करण्यात आला, ज्यामध्ये C6–C7 पातळीवर गंभीर डिस्क प्रोलॅप्सचे निदान झाले, ज्यामुळे त्यांना होत असलेल्या तीव्र वेदनांचे कारण देखील स्पष्ट झाले. रुग्णाला तात्काळ खारघर येथील मेडिकव्हर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या स्थितीची गंभीरता तसेच शारीरीक हालचाली व मानसिक आरोग्यावरील परिणाम लक्षात घेता सविस्तर मूल्यांकन आणि समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले. सर्व उपचार पर्यायांवर चर्चा केल्यानंतर, टीमने सर्व्हायकल डिस्क रिप्लेसमेंट (Cervical Disc Replacement)  शस्त्रक्रियेची योजना आखली. *मेडिकव्हर हॉस्पिटलचे अस्थिरोग तज्ज्ञ व मणक्याचे सर्जन डॉ. निखिल भारंबे सांगतात की,* जेव्हा ही रुग्ण रुग्णालयात दाखल झाली, तेव्हा तिला तीव्र वेदना होत होत्या आणि मज्जातंतूवर तीव्र दाब आल्यामुळे तिला सरळ झोपणे किंवा हालचाल करणे शक्य होत नव्हते. क्लिनिकल तपासणी आणि एमआरआयच्या निष्कर्षांवरून स्पष्टपणे दिसून आले की, C6–C7 डिस्क मोठ्या प्रमाणात सरकली होती आणि C7 मज्जातंतूच्या मुळावर दाब येत होता. घरात काम करताना अचानक पुढे वाकल्यामुळे असे झाले होते. आयव्हीद्वारे वेदनाशामक औषधं, स्टिरॉइड्स आणि अगदी फेंटॅनाइल पॅच देऊनही तिच्या लक्षणांमध्ये फारशी सुधारणा झाली नव्हती. अशा प्रकरणांमध्ये सर्व्हायकल डिस्क रिप्लेसमेंट अत्यंत फायदेशीर ठरते, कारण ते मानेची हालचाल टिकवून ठेवते, मान आखडणे टाळते आणि  मणक्याची झीज होण्याचा धोका कमी करते. रुग्णाचे योग्य समुपदेशन करण्यात आले आणि तिच्या वेदना स्थिर झाल्यावर आम्ही शस्त्रक्रियेची योजना आखली. शस्त्रक्रियेपूर्व तपासणीनंतर दोन दिवसांनी तिच्या शस्त्रक्रियेचे नियोजन करण्यात आले.

 *डॉ. भारंबे पुढे सांगतात की,* ही शस्त्रक्रिया ग्लोबसच्या 'सिक्युअर-सी' कृत्रिम डिस्कचा वापर करून करण्यात आली. या शस्त्रक्रिया मध्ये डॉ मधुकर नायक न्यूरोसर्जन यांनी सुद्धा आपल्या मदत केली. या प्रक्रियेमध्ये खराब झालेली डिस्क काढून टाकली जाते आणि तिच्या जागी कृत्रिम डिस्क बसवली जाते, जेणेकरून रुग्णाची मान ही कोणत्याही वेदनांशिवाय सामान्यपणे हलचाल करु शकेल. भूलतज्ज्ञ डॉ. शहाबुद्दीन यांच्या सहकार्यामुळे ही गुंतागुंतीची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यास यश आले. ही शस्त्रक्रिया सुमारे २ तास चालली आणि त्यानंतर अवघ्या काही तासांतच तिच्या वेदना पूर्णपणे नाहीशा झाल्या आणि १२ तासांच्या आत ती आहाराचा स्विकार करु लागली. शस्त्रक्रियेनंतर ३ दिवसांनी तिला घरी सोडण्यात आले. अशा रुग्णांवर योग्य वेळी उपचार न केल्यास, मज्जातंतूंचे नुकसान, स्नायूंची झीज किंवा दीर्घकाळ उपचार न झाल्यास पक्षाघातासारखी गुंतागुंत होऊ शकते. हे प्रकरण मेडिकव्हरमधील आमचे पहिले सर्व्हायकल डिस्क रिप्लेसमेंट ठरले आहे.

 *आपला अनुभव सांगताना रुग्ण म्हणाली,* मी अशा टप्प्यावर पोहोचले होते, जिथे रुग्णाला अगदी थोडीफार हालचाल करणेही अशक्य वाटत होते. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहिल्याशिवाय रुग्ण झोपू शकत नव्हता. आराम मिळावा म्हणून मी रात्रभर हात वर करून बसायचे. सततच्या वेदनांमुळे मी घाबरले होती, थकले होते आणि मी असे किती दिवस काढू शकेन याची मला खात्री नव्हती. जेव्हा मी डॉ. भारंबे यांना भेटले आणि त्यांनी मला ती प्रक्रिया समजावून सांगितली, तेव्हा जणू काही कोणीतरी मला आशेचा किरण दाखवला आहे असे वाटले. शस्त्रक्रियेनंतर जागे झाल्यावर, ज्या वेदनांशी मी इतके दिवस झगडत होते, त्या पूर्णपणे नाहीशा झाल्या. मला माझे आयुष्य परत मिळाल्यासारखे वाटले. डॉ. भारंबे, डॉ. मधुकर नायक (न्यूरोसर्जन) आणि संपूर्ण मेडिकव्हर हॉस्पिटलच्या टीमचे मी मनापासून आभार मानते, कारण त्यांनी मला एक नवीन आयुष्याची भेट दिली .
Comments