करंजाडेत दुर्गा मातेच्या दर्शनाला भाविकांची अलोट गर्दी ...
करंजाडेत दुर्गा मातेच्या दर्शनाला भाविकांची अलोट गर्दी ...

दांडिया रास सह विविध कार्यक्रमांचे आयोजन...


पनवेल वैभववृत्त सेवा  : 
करंजाडे येथील विनोद साबळे यांनी बांधलेल्या दुर्गामातेच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत आहे. रात्रीच्या वेळेस या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 
       शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख (उरण विधानसभा) विनोद साबळे यांच्या वतीने दुर्गा माता मंदिर ग्रामपंचायत करंजाडे समोर नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी महिलांसाठी पैठणीच्या खेळाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच दररोज वेगवेगळ्या मोनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी मोठ्या संख्येने महिला यात सहभागी होत आहेत. सर्व करंजाडेवासीय या देवी माऊलीच्या भक्तिमय आनंदोत्सवात सहभागी होत आहेत. अनेक मान्यवर यावेळी मातेच्या दर्शन सोहळ्याचा लाभ घेत आहेत.

मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी देखील दुर्गा मातेचे दर्शन घेतले. भाविकांची या ठिकाणी गर्दी होत आहे. यावेळी विनोद साबळे- उपजिल्हा प्रमुख, उरण विधानसभा, मिरेंद्र शहारे- शहरप्रमुख करंजाडे, अंजु सिंह- महिला शहरप्रमुख, करंजाडे, दिनेश धामनस्कर- शाखाप्रमुख, सेक्टर ६, भरत कारळेकर, युवा सेना, सुजित जाधव- शाखाप्रमुख, सेक्टर ३, त्रिशूल रक्षिकर उपशहरप्रमुख, रविंद्र पाटील- उपशहरप्रमुख सेक्टर ३ यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image