अभिनयाचा बादशहा अशोक सराफ यांच्या स्वागतासाठी उलवे नगरी सज्ज....
अभिनयाचा बादशहा अशोक सराफ यांच्या स्वागतासाठी उलवे नगरी सज्ज....

मान्यवरांच्या साक्षीने होणार अशोक सराफ यांचा रविवारी भव्य नागरी सत्कार...
उलवे, ता. २५ : मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते, 'पद्मश्री' आणि 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारप्राप्त, अभिनयाचे बादशहा अशोक सराफ यांचा सपत्निक भव्य नागरी सत्कार रविवारी (ता. २८) उलवे नोडमधील 'भूमिपुत्र भवन' येथे मान्यवरांच्या साक्षीने होणार आहे. रायगड, नवी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने हा नागरी सत्कार होणार आहे. हा सत्कार समारंभ शेलघर येथील यमुना सामाजिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी आयोजित केला आहे. यासाठी उलवे नगरी सज्ज झाली आहे.
या सत्कार समारंभाला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, रायगडचे खासदार सुनील तटकरे, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री आणि आंध्र प्रदेशचे माजी राज्यपाल सुशीलकुमार शिंदे, माजी खासदार रामशेठ ठाकूर उपस्थित राहणार आहेत. 

गेली अनेक दशके मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते, रसिकांना खळखळून हसविणारे अवलिया अशोक सराफ यांना मानाचा मुजरा करण्यासाठी रसिक आतुर आहेत. या सत्कार सोहळ्याला रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. 

आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत म्हणतात, "ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी मराठी मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यांच्या अनेक चित्रपटांमुळे रसिकांना मनमुराद आनंद मिळाला आहे. अनेक पिढ्यांनी त्यांच्या चित्रपटांचा आस्वाद घेतला आहे. त्यांना चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीबद्दल आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे, याचा मला अतिशय आनंद आहे. त्यांचा यथोचित गौरव मराठी मनातर्फे व्हावा, असे मला वाटत होते. त्यामुळेच त्यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन केले आहे."
Comments
Popular posts
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image
स्वीकृत नगरसेवक पदी प्रथमेश सोमण यांच्या नावावर शिक्कामोर्तब...
Image