सिफेअर्स युनियन सदस्यां तर्फे मा. आमदार बाळाराम पाटील यांचा उद्या सत्कार...
न्यायालयिन याचिकेवर सकारात्मक निर्णय ...नाविक कामगार नेते गौरव पोरवाल
मुंबई (पनवेल वैभव ) :- नोवहन महानिर्देशनालयाच्या ३१/२०२५ या नवीन काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार होंडूरास, पनामा वेलीज ,कुक आइलँड सहित अन्य देशाच्या प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या नागरिकांच्या गुणवत्ता व योग्यतेच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असल्याने या वर आक्षेप घेत त्यामध्ये अनेक अटी ,शर्ती लादल्याने नाविक क्षेत्राच्या नियमावलित हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. यामुळे ग्लोबल सिफेअर्स युनियन ऑफ इंडिया च्या बैठकित माजी आमदार बाळाराम पाटील व युनियनचे नाविक क्षेत्रातील तज्ञ, अभ्यासक कामगार नेते गौरव पोरवाल यांच्या नेतृत्वाखाली भारत देशातील नाविकांच्या रोजगारावर गदा निर्माण होत असल्याने मा.कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.
आज त्या याचिकेवर मा. कोर्टाने FOC ,CoC असलेल्या सर्व भारतीय सागरी कर्मचाऱ्यांच हित लक्षात घेता सकारात्मक अश्या अनेक मार्गदर्शक सूचना केल्या असल्याचे समजते. ज्यात FOC, CoC असलेल्या सागरी कर्मचाऱ्यांवर या पुढे एक तर्फी असे कोणताही निर्णय घेऊन सागर प्रवास बंदी करणार नाही असे सांगितले. यात सागरी कर्मचारी सध्या जहाजावर अधिकृतपणे कार्यरत आहेत, ते त्यांच्या करारानुसार काम सुरू ठेवू शकतात, यावर कोणतीही अडचण निर्बंध येणार नाही.
हा सकारात्मक निर्णय संपूर्ण सागरी समुदायासाठी एक मोठा ऐतिहासिक निर्णय असल्याने लाखो नाविकांच्या जीवनात मोठा दिलासा मिळणार आहे. आणि यावर देशातील समुद्री करिअरच्या प्रत्येक धोरणात्मक निर्णयाचा पाठिंबा मिळाल्याने भविष्यात नक्कीच नाविकांच्या योग्यता व सुरक्षा संबंधित महत्वपूर्ण पाऊल उचलतील अशी अपेक्षा DG शिपिंग कडून केली जात आहे .या न्यायालयीन आनंदोत्सवात लढा देणाऱ्या नाविक क्षेत्रातील विधितज्ञ ,कामगार, संघटना सदस्यांनी माननीय कोर्टाचे आभार मानत आदेशाचे स्वागत करत एकमेकांना तोंड गोड करून मिठाई वाटप केली. तसेच रायगड कोकण युनियन च्या शिष्टमंडळाच्या वतीने ग्लोबल सिफेअर्स युनियन ऑफ इंडियाचे मार्गदर्शक कामगार नेते माजी आमदार बाळाराम पाटील व युनियनचे नाविक क्षेत्रातील तज्ञ,अभ्यासक कामगार नेते गौरव पोरवाल यांचे सत्कार करण्याचे ठरविले आहे .