श्री प्रल्हादराव झुलेलाल ट्रस्ट, आम्ही रक्तदाते पनवेलचे ,पूज्य सिंधी पंचायत ट्रस्टच्या माध्यमातून रक्तदान शिबीर संपन्न...
पनवेल वैभव / दि.१४(वार्ताहर): श्री प्रल्हादराव झुलेलाल ट्रस्ट, आम्ही रक्तदाते पनवेलचे ,पूज्य सिंधी पंचायत ट्रस्ट ,विद्यार्थी वाहक संस्था पनवेल ,रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन ,पनवेल नवी मुंबई प्रिंट डिजिटल पत्रकार संघटना व पनवेल तालुका पत्रकार विकास मंच यांच्या वतीने झुलेलाल मंदिर येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये एकूण 105 रक्तदात्यांनी सहभाग घेतला
यावेळी आरोग्य तपासणी शिबिर व अवयव दान विषयीच्या मार्गदर्शन शिबिरास पनवेलकरांनी भरघोस पाठिंबा दिला. सदर शिबिर यशस्वी करण्याकरिता ऍडव्होकेट मनोहर सचदेव, अमोल साखरे, मुरलीधर ढाके, भूषण चोणकर, किसन रौंदळ, पांडुरंग हुंमणे ,निलेश पोटे, इंदुमती ठक्कर , सचिन भिसे, संगीता साखरे यांनी विशेष मेहनत घेतली. सदर रक्तदान शिबिराला पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे, पत्रकार संजय कदम यांनी सदिच्छा भेट दिली व रक्तदात्यांचे मनोधैर्य वाढवले. या रक्तदान शिबिराचं वैशिष्ट्य हे की 58 वर्षाच्या मालोतकर यांनी पहिल्यांदा रक्तदान केले. सदर रक्तदान शिबिर आयोजनामध्ये मोलाचा सहभाग असणारे ऍडव्होकेट मनोहर सचदेव यांनी सर्व रक्तदात्यांचे तसेच या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी सर्व संस्थांचे व टाटा मेमोरियल सेंटर खारघर या रक्तपेढीचे आभार मानले व पुढील रक्तदान शिबिर 12 ऑक्टोबर रोजी असल्याचे जाहीर केले.
फोटो: रक्तदान शिबीर