पनवेलमधील हाय-फिटनेस स्टुडिओ येथे '‘जिल्हा पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025’' स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न
पनवेल वैभव / दि. 13 (वार्ताहर) : पनवेलमधील नुकत्याच हाय-फिटनेस स्टुडिओ येथे ‘जिल्हा पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025’ स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
अमेचर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडरेशनच्या मार्गदर्शनाखाली स्पोर्ट्स फाउंडेशन, नवी मुंबई यांच्या वतीने ‘जिल्हा पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025’ स्पर्धेचे आयोजन नुकताच करण्यात आले होते. हि स्पर्धा महाराष्ट्र पॉवरल लिफ्टिंग संघटनेचे सेक्रेटरी छत्रपती अवॉर्ड विजेते संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली असून स्पर्धेत अनेक नामांकित खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल जिम ओनर प्रशांत खुटले यांना उद्योजक मिलिंद पोटे, पॅन 3 शोरूम मालक राजूभाई धरोड, राजेश सर व मास्टर रेहांश यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना उद्योजक मिलींद पोटे यांनी सांगितले की, पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा भरविण्यात येईल. यामध्ये मास्टर रेहांश याचा मोठा सहभाग असेल. अशा प्रकारच्या स्पर्धा सातत्याने पनवेलमध्ये भरविणे गरजेचे आहे.
फोटो ः जिल्हा पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेदरम्यान उद्योजक मिलींद पोटे, मास्टर रेहांश व इतर मान्यवर