थोर समाजसुधारक स्व.जनार्दन आत्माराम भगत यांच्या ३७ व्या पुण्यतिथी निमित्ताने नियोजन आढावा बैठक संपन्न..
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन आढावा बैठक उलवे येथे संपन्न

पनवेल / प्रतिनिधी : -
कष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व.जनार्दन आत्माराम भगत यांच्या ३७ व्या पुण्यतिथी निमित्ताने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ०७ मे रोजी समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 
त्या संदर्भातील आयोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने मैदानाची पाहणी व अंतिम नियोजन आढावा बैठक लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुकवारी (दि. ०२) उलवे नोडमध्ये पार पडली.  

यावेळी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हॉईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, भाऊशेठ पाटील, रत्नप्रभा घरत, नेरे मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, नवीन पनवेल मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, कामोठे मंडल अध्यक्ष विकास घरत, संजय भगत यांच्यासह विविध समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image