विविध नागरी समस्यांचे निराकरण करण्याची युवा सेनेने केली आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे मागणी..
युवा सेनेने केली आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे मागणी..

पनवेल वैभव, दि.24 (वार्ताहर) ः पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील महत्वाच्या विषयासंदर्भात आज युवासेना जिल्हा अधिकारी पराग शरद मोहिते यांनी युवासेनेच्या पदाधिकार्‍यांसह महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेतली. व विविध विषयांसंदर्भात चर्चा करून मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावेळी युवा सेना जिल्हाधिकारी पराग मोहिते यांच्यासह तालुका अधिकारी मनोज कुंभारकर, महानगर अधिकारी महेश भिसे, महानगर चिटणीस जीवन पाटील, तालुका चिटणीस अजय पाटील, पनवेल शहर अधिकारी  निखिल भगत, नविन पनवेल शहर अधिकारी जितेंद्र सिद्धू, शहर चिटणीस सृजन जोशी आदी पदाधिकारी तथा युवासैनिक उपस्थित होते. यावेळी आयुक्त मंगेश चितळे यांच्याशी चर्चा करताना पराग मोहिते यांनी सांगितले की, मध्यंतरी युवासेनेच्या माध्यमातून पानपट्टी हटवण्याची मोहीम हाती घेतली होती. या दरम्यान महापालिकेने जवळपास सर्वच अवैध्य पानपट्ट्या हटवल्या होत्या. मात्र काही काळाने पुन्हा त्या पानपट्ट्या सदर ठिकाणी स्थापित झाल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून सदर पानपट्ट्या या कायमस्वरूपी हटवून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी युवासेनेने केली. आयुक्तांची त्वरित दखल घेत प्रशासनाला सदर कारवाईच्या सूचना केल्या. तसेच पनवेल परिसरातील सर्व खाजगी, शासकीय आणि निमशासकीय शाळांचे स्ट्रक्चरल ऑडीट करणे तसेच अपूर्ण असलेली कामे नवीन शालेय कार्यकाळ सुरू होण्यापूर्वी करून घेण्याचे आदेश शाळांना देण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांकडे मागणी केली. आयुक्तांनी सदर विषयाची दखल घेत युवासेना शिष्ठमंडळासमोरच अधिकार्‍यांना तातडीने शाळा आणि कॉलेजना या संदर्भात आदेश काढण्याच्या सूचना केल्या. तसेच याचा वैयक्तिक पाठपुरवठा करणार असल्याचेही आश्‍वासित केले. त्याचप्रमाणे देवीचा पाडा येथील एमआयडीसी आणि महापालिका दरम्यान बांधण्यात आलेल्या रस्त्यामुळे रस्ता आणि ड्रेनेज लाईन यातली तफावत पुढील संभाव्य पाणी तुंबण्यात प्रवर्तित होऊ शकते हे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. यावर आयुक्तांनी शहर अभियंत्यांना तातडीने निरीक्षण पथक नेमून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. तसेच त्याचा अहवालही पाठवण्यास सांगितले.
फोटो ः युवा सेना निवेदन
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image