पनवेल महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ दिमाखात साजरा...

रामशेठ ठाकूर, महेंद्रशेठ घरत यांचे विद्यार्थांना मार्गदर्शन ...


उलवे, ता. 26 : 
"महेंद्रशेठ घरत हे 'ऑल राऊंडर' आहेत. विद्यार्थांनो, त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. तो अनेकांना भरभरून मदत करतोय, आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांचे नेतृत्व करतोय, ही अभिमानास्पद बाब आहे. याच महाविद्यालयात त्याचे शिक्षण झाले. त्यामुळे इथे शिकणारा विद्यार्थी जागतिक पातळीवरही लीलया वावरतो, याचे महेंद्रशेठ हे उत्तम उदाहरण आहे. मी 50 पैसे, 1 रुपया रोजंदारीवर काम केले. आईसोबत फाट्या आणण्यासाठी गव्हाणफाटा येथे जायचो, गरिबीशी लढलो, पण आता चांगले दिवस आल्यावर शक्य तिथे मदत करतोय. त्यामुळे विद्यार्थांनो, आवडीच्या क्षेत्रांत झोकून द्या. आई-वडिलांचा सन्मान ठेवा, असे माजी खासदार रामशेठ ठाकूर विद्यार्थांना मार्गदर्शन करताना म्हणाले. शनिवारी (ता. 26) पनवेल येथील महात्मा फुले आर्टस, काॅमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ झाला. त्यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत म्हणाले, "शिवरायांनी रयतेचे राज्य निर्माण केले, तसेच कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्था स्थापन करून गरिबातला गरीब विद्यार्थी शिकण्याची व्यवस्था केली, म्हणूनच आमच्यासारखे असंख्य गरीब शिकू शकले, मी तर  आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेऊ शकलो. रामशेठ ठाकूर यांचा मी आदर्श घेतो. रयत गीत म्हणजे रामशेठ ठाकूर, ते कुठलेही काम झोकून देवून करतात. रामशेठ यांचे जीवन हेच आमचे मार्गदर्शन. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, नोकरीच्या मागे लागू नका, छोटामोठा व्यवसाय करा, तुम्ही निश्चितच यशस्वी व्हाल, असा सल्ला महेंद्रशेठ घरत यांनी विद्यार्थांना दिला.

डाॅ. जे. जी. जाधव म्हणाले, विद्यार्थ्यांनो पदवीला, मेहनतीची जोड द्या. आपल्यात असणारे गुण ओळखा आणि संयमाने, जिद्दीने वाटचाल केलीत तर आयुष्यात तुमची प्रगती होणारच, असा विश्वास यावेळी विद्यार्थांना त्यांनी दिला.
यावेळी प्राचार्य डाॅ. गणेश ठाकूर यांनी  महाविद्यालयाच्या वाटचालीचा आढावा मनोगताद्वारे सांगितला. ते म्हणाले, "महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी कला, क्रीडा, स्पर्धा परीक्षा यांत घवघवीत यश मिळवीत आहेत. महाविद्यालयाला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. संशोधन  महाविद्यालयाची वाटचाल जोमाने सुरू आहे. लवकरच एआयचा वापर  रयत शिक्षण संस्थेत मोठ्या प्रमाणावर होईल. सरकारने रयतचा आदर्श शिक्षण संस्था म्हणून गौरव केला आहे. ही गौरस्पद बाब आहे."
यावेळी आर्टस, काॅमर्स आणि सायन्सच्या प्रथम आलेल्या विद्यार्थांना पदवी प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी रयत गीत, विद्यापीठ गीत आणि राष्ट्रगीत सुमधुर आवाजात लयबद्ध संगीतात सादर केले.
यावेळी डॉ. जे. जी. जाधव, डाॅ. नामदेव पवार, डाॅ. प्राचार्य गणेश ठाकूर, डाॅ. राजाराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image