कळंबोली वाहतूक शाखेतर्फे प्रबोधनासह जनजागृती उपक्रम...
कळंबोली वाहतूक शाखेतर्फे प्रबोधनासह जनजागृती उपक्रम

पनवेल वैभव, दि.30 (वार्ताहर) ः कळंबोली वाहतूक शाखेतर्फे वाहन चालक मालकांचे प्रबोधनासह जनजागृती उपक्रम सुरू असून त्या अंतर्गत विविध ठिकाणी मार्गदर्शन केले जात आहे.
नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिभाऊ बानकर यांनी खांदेश्‍वर रेल्वे स्टेशन येथे रिक्षाचालक व प्रवासी  यांना रस्ते अपघात कसे कमी करता येतील, वाहन चालकांनी वाहन चालवताना नशा न करणे, दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट वापरा, फोर व्हीलर चालकांनी शीट बेल्ट वापरा, रिक्षा चालकांनी एक्सेस पॅसेंजर न भरणे, प्रॉपर युनिफॉर्म परिधान करणे , रिक्षा चालकांनी प्रवाशाची सौजन्याने वागणे, रिक्षा चालकांनी महिला प्रवासी लहान मुले तसेच वृद्धांना सहकार्य करणे इत्यादी गोष्टींची माहिती देऊन वाहतुकीच्या नियमांच्या संदर्भात जनजागृती केली. सदर वेळी 45 ते 50 रिक्षा चालक व प्रवासी उपस्थित होते सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सदर प्रबोधनाबाबत समाधान व्यक्त केले.




फोटो ः वपोनि हरिभाऊ बानकर मार्गदर्शन करताना
Comments
Popular posts
एकता मित्र मंडळ लाईन आळी तर्फे होलिकोत्सव व संत तुकाराम महाराज बीज निमित्त सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन...
Image
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नगरसेवक मनोज भुजबळ यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट..
Image
गोदरेज प्रॉपर्टीजचा एक लाख घरांच्या विक्रीचा टप्पा पूर्ण ; कुटुंबाला मोफत घराची अनोखी भेट..
Image