पत्रकार संजय कदम यांना रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने देण्यात आला “शांतता आणि संघर्ष निवारण पुरस्कार”...
     “शांतता आणि संघर्ष निवारण पुरस्कार”...
पनवेल वैभव, दि.२४ (वार्ताहर) : पनवेल तालुका प्रेस क्लबचे सदस्य व रायगड जिल्हा प्रेस क्लबचे सल्लागार संजय कदम यांच्या ३० वर्षाच्या पत्रकारीता आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने  “व्यवसाय सेवा पुरस्कार” आणि “शांतता आणि संघर्ष निवारण पुरस्कार” ने त्यांना सन्मानित करण्यात आले.  
             पनवेल शहरातील सिंधी पंचायत सभागृह येथे हा सोहळा संपन्न झाला. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल तर्फे दरवर्षी व्यवसाय करतानाच समाजासाठी काम करणाऱ्या एखा‌द्या सेवाभावी व्यक्तीला व्यावसायिक सेवा पुरस्कार प्रदान करण्यात येत असते. पनवेल तालुका प्रेस क्लबचे सदस्य व रायगड जिल्हा प्रेस क्लबचे सल्लागार संजय कदम यांच्या ३० वर्षाच्या पत्रकारीता आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत रोटरी 3131 चे जिल्हा गव्हर्नर शीतल शाह यांच्या हस्ते “व्यवसाय सेवा पुरस्कार” आणि “शांतता आणि संघर्ष निवारण पुरस्कार” ने त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी रोटरी जिल्हा प्रथम महिला रागिणी शाह, सहाय्यक गव्हर्नर डॉ. किरण कल्याणकर, पीडीजी डॉ. गिरीश गुणे, अध्यक्ष शैलेश पोटे, सचिव दीपक गडगे, रोटेरियन आणि अनस, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल सदस्य उपस्थित होते.
फोटो : संजय कदम यांचा शांतता आणि संघर्ष निवारण पुरस्कार ने सन्मान
Comments
Popular posts
'शौर्यम दिवस' के मौके पर 'शौर्यम ट्रिब्यूट बाइक राइड' का आयोजन...
Image
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
हृदयाच्या आरोग्यासाठी खारघरमध्ये 'वॉकेथॉन' ; जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा उपक्रम...
Image
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखेंची पेणमध्ये सदिच्छा भेट ; बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाला उपस्थिती
Image
उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत क्रीडांगण उभारण्याची मागणी ; नगरसेवक ऍड.मनोज भुजबळ यांचे महापौरांना निवेदन
Image