६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने पनवेलमध्ये महामानवास करण्यात आले अभिवादन...
६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने पनवेलमध्ये महामानवास करण्यात आले अभिवादन
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पनवेल मतदार संघाचे आमदार आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितिन पाटील, मागासवर्गीय समाजाचे नेते ऍड प्रकाश बिनेदार यांच्यासह भीम अनुयायी उपस्थित होते.  महापरिनिर्माणदिनाच्या पार्श्वभूमीवरती पनवेल महापालिकेच्यावतीने पुतळापरिसराची स्वच्छता करण्यात आली होती. तसेच मंडप घालून सुशोभिकरण करण्यात आले आहे. याबरोबरच पनवेल, खारघर, कामोठे याठिकाणहून दादरला, चैत्यभूमीकडे जाणाऱ्या अनुयायांसाठी चहा, पाणी आणि बिस्किटे यांची सोय महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
शिबिरात दिलेला शब्द उपचारापर्यंत जपला ; रुग्णांच्या भेटीला प्रितम म्हात्रे...
Image
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
रुग्णालयातून घरी गेल्यानंतर उपचारांसाठी मेडिकव्हरचा ‘होमवॉर्ड’ उपक्रम..
Image
गणेशोत्सव मंडपात गिरविले ‘सीपीआर’चे धडे ; मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे नागरिकांना सीपीआरचे प्रशिक्षण...
Image
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर संस्कृती आणि परंपरेचा उत्सवी रंग ; ढोल-ताशांच्या गजरात अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
Image