लोकनेते दि. बा. पाटील यांचे त्याग व परिश्रम महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी ऊर्जा - पंतप्रधान नरेंद्र मोदी
रायगड विकासाची गाथा लिहणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी 
पनवेल रायगड भविष्यातील विकासाचे सेंटर बनणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
लोकनेते दि. बा. पाटील यांचे त्याग व परिश्रम महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी ऊर्जा  - पंतप्रधान नरेंद्र मोदी
रायगड सोबत माझे भावात्मक आत्मिक संबंध -पंतप्रधान नरेंद्र मोदी
पनवेल (हरेश साठे) विमानतळ, अटल सेतू, सेमी कंडक्टर, डेटा सेंटर अशा विविध प्रकल्पाच्या अनुषंगाने रायगड विकासाची गाथा लिहणार आहे. आणि त्या अनुषंगाने पनवेल रायगड भविष्यातील विकासाचे सेंटर बनणार असून त्यामुळे या ठिकाणी लाखोच्या संख्येने रोजगार उपलब्ध होणार असे, असे आश्वासक प्रतिपादन देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज खारघर येथे केले. 
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्रपक्षाचे उमेदवार मंत्री रवींद्र चव्हाण (डोंबिवली), आमदार संजय केळकर (ठाणे शहर), आमदार प्रशांत ठाकूर (पनवेल), आमदार गणेश नाईक (ऐरोली), आमदार महेश बालदी (उरण), आमदार मंदा म्हात्रे (बेलापूर), आमदार रवीशेठ पाटील (पेण), आमदार महेंद्र थोरवे (कर्जत) यांच्या प्रचारार्थ झालेल्या विजय संकल्प सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 
यावेळी व्यासपीठावर उमेदवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, खासदार धैर्यशील पाटील, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार विक्रांत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, प्रकल्पग्रस्तांचे झुंझारनेते दि. बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे, महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, प्रभाकर कांबळे, पनवेल विधानसभा संयोजक व भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ऍड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, आश्र्विनी पाटील, मनोहर म्हात्रे आदी उपस्थित होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाच्या विकासाचा संकल्प फक्त भाजप आणि महायुती सरकार करणार. काँग्रेसने फक्त गरिबाला गरीबच बनवून ठेवले आहे. गरिबी हटावचा खोट्या घोषणा देत काँग्रेसने दिवस घालवले. काँग्रेसने गरिबांना लुटलं आहे. गरीब या संकटातून बाहेर आला नाही. स्वातंत्र्यांच्या ७० वर्षानंतरही घर कपडे आणि जेवण यासाठी तरसत होते. पण पहिल्यांदा भाजप प्रणित सरकारने २५ हजार कोटी जनतेला गरिबीच्या खाईतून बाहेर काढले आहे, असेही त्यांनी सांगितले. आम्ही पक्की घर आणि सुरक्षा गरिबांना दिली. शौचालय बांधून देण्याच काम केले. जलजीवन मिशन अंतर्गत १२ करोड जनतेच्या घरात पाणी पोहोचवले. आज सगळ्यांकडे बँक खाते आहे. रेल्वे पटरीवर काम करणारा मजूरही आज युपीएयने पेमेंट करतो. गरीब माणूस स्वतः पुढे जातोय देशाला पुढे नेतोय. या सगळ्या योजनांचा सगळ्यात मोठा लाभार्थी दलित, आदिवासी आणि मागासलेल्या व्यक्तीला झाला आहे, असे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, देशातल्या ८० करोड लोकांना मोफत रेशन पोहोचवले जात आहे. रायगडमध्ये १८ लाख लोकांना मोफत रेशन मिळत आहे. या कामाला कोणाचा विरोध असू शकतो का ? काँग्रेस पार्टीला याचा आनंद होत नाही. दुख होतय. अशा लोकांना संधी मिळाली नाही पाहीजे. खुलेआम त्यांचा एक नेता म्हणतोय जे रोहिंग्या आहेत. त्यांना स्वस्तात गॅस देणार आहेत. काँग्रसला थांबवण्याची मोठी जबाबदारी गरिबांवर आहे. २० हजार कोटींनी नवी मुंबई एयरपोर्ट बनत आहे. ८० हजार कोटींनी वाधवान बंदर बनत आहे. ८३ हजार कोटीचे सेमी कंडक्टर प्रकल्प, आशिया खंडातील दुसरा सर्वात मोठा डेटा एआय केंद्र या ठिकाणी बनणार आहे, त्यामुळे येथील युवकांना मोठी संधी निर्माण होत असल्याचेही त्यांनी म्हंटले. माझी लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी काँग्रेस महाआघाडीने प्रयत्न केले. न्यायालयात गेले पण ते या योजना बंद करण्याच्या प्रयत्नात असलेले तरी आम्ही ०३ करोड बहिणीना लखपती करणार आहोत, त्या अनुषंगाने महिलांच्या विकासासाठी योजना अंमलात आणत असून त्यांना दरवर्षी किमान १ लाख रुपये मिळतील असे नियोजन आमचे आहे. असेही त्यांनी नमूद करतानाच लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे अधोरेखित केले. तसेच देशातील प्रत्येक नागरिकाने एकसंघ राहिले पाहिजे असेही नमूद केले. त्याचबरोबर तुम्ही फक्त आमदार नाही तर महाराष्ट्राचा विकास निवडणार आहात, त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहनही त्यांनी जनतेला केले. 
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले कि, अटल सेतू आणि मेट्रोच्या कामाला स्थगिती देण्याचे काम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने केले. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी याकडे विशेष लक्ष देत हे प्रकल्प पूर्णत्वास नेले आणि या प्रकल्पांचा वाहतुकीच्या दृष्टीने नागरिकांना मोठा फायदा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेण्यापूर्वी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक होऊन निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका लावला आणि विजयाचा इतिहास घडवला. २० नोव्हेंबरला प्रत्येक मतदाराने मतदानाचा अधिकार वापरायचा आहे. १० वर्षांचा तुलनात्मक आढावा घेतला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासाचा आलेख उंचावला, असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विमानतळ, कॉरीडोर, कोस्टल रोड, अटल सेतू, रस्त्यांचे जाळे निर्माण झाले, जलजीवन योजना आणून पाण्याचा प्रश्न निकाली लागला, लोडशेडिंग बंद झाले, मेट्रो सुरु झाली, गरजेपोटी घरे नियमित करण्याचा निर्णय झाला, अशा विविध योजना आणि प्रकल्पामुळे हा भाग मोठ्या प्रमाणात विकसित झाला असल्याचे त्यांनी नमूद करतानाच महायुती सरकारच्या कामगिरीचा सर्वाना अभिमान आहे असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता करासंदर्भात विरोधकांनी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला. न्यायालयात गेले. आणि हे विरोधक महाविकास आघाडीवाले सत्तेत होते त्यावेळी मालमत्ता कराबाबत का निर्णय घेऊ शकले नाही. असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शास्ती माफ करण्याचा घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांचे आभार मानले.

आम्ही काँग्रेसला समाजा-समाजात फूट पाडू देणार नाही :पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, काँग्रेस नेहमीच आरक्षणाच्या विरोधात राहिली आहे. देशाचा विकास त्यांना नेहमीच खूपत आला आहे. समाजांमध्ये फूट टाकणे आणि सत्ता काबीज करणे हेच त्यांचे आजवरचं धोरण राहिले आहे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गांमधील समाजांना फोडण्याचा षडयंत्र काँग्रेसने रचलं आहे. परंतु, आम्ही त्यांना यामध्ये यशस्वी होऊ देणार नाही”.काँग्रेसचे नेते परदेशांमध्ये जातात आणि खुलेआम घोषणा देतात की आम्ही आरक्षण संपवून टाकू. आता ते महाविकास आघाडीतील पक्ष महाराष्ट्रातील छोट्या छोट्या जातींमध्ये फूट पाडण्याचं काम करत आहेत. जेणेकरून त्या छोट्या जातींची, समुदायांची राजकीय शक्ती कमी व्हावी आणि ठराविक लोकांनाच सत्तेचा मलिदा मिळावा.काँग्रेसने नेहमीच सत्ता मिळवण्यासाठी समाजा-समाजांचं विभाजन करण्याचा प्रयत्न केला आहे. विकासाऐवजी फोडा आणि राज्य करा ही त्यांची नीती राहिली आहे”.

वैद्यकीय सोय-
 २५ हजार कार्यकर्ते एकाच ठिकाणी जमणार असल्याने कार्यकर्त्यांच्या वैद्यकीय मदतीसाठी येथे वैद्यकीय मदत कक्ष अनेक ठिकाणी उभारण्यात आले होते.

मोदीमय वातावरण- 
खारघर उपनगरामध्ये गुरुवारी दुपारपासून मोदीमय वातावरण झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेत मोदींचे विचार ऐकण्यासाठी पनवेल, उरण आणि नवी मुंबईसह, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील विविध मतदारसंघातून भाजप महायुतीचे भाजपचे हजारो कार्यकर्ते खारघरमध्ये दाखल झाले. वंदे मातरम, जय श्रीराम अशा विविध घोषणा देत हे कार्यकर्ते दाखल होत होते.
Comments