राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत हवे -आमदार प्रशांत ठाकूर..
राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत हवे -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल (प्रतिनिधी) सर्वसामान्य जनतेचा विचार करणारे महायुतीचे सरकारच राज्यात पुन्हा सत्तेत यायला पाहिजे, असे प्रतिपादन भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर पाटीदार समाजाच्या बैठकीत केले. या बैठकीत खारघरमधील कच्छ कडवा पाटीदार समाज, कच्छ वागड लेवा पाटीदार समाज आणि सौराष्ट्र लेवा पटेल समाजाने आपला पाठिंबा आमदार प्रशांत ठाकूर यांना जाहिर केला.
       पनवेल मतदार संघाचा विकासासाठी सदैव तत्पर असलेले आमदार प्रशांत ठाकूर यांना विधानसभा निवडणुकीसाठी विविध संस्था, संघटना तसेच समाजाच्या वतीने पाठिंबा जाहिर करण्यात येत आहे. त्यानुसार खारघरमध्ये झालेल्या पाटीदार समाजाची बैठक झाली. यात आमदार प्रशांत ठाकूर यांना खारघर कच्छ कडवा पाटीदार समाज, कच्छ वागड लेवा पाटीदार समाज, आणि सौराष्ट्र लेवा पटेल समाजाने आपला जाहिर पाठिंबा दिला.
         या बैठकीला भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, कच्छ कडवा पाटीदार समाजाचे अध्यक्ष कांतीभाई पटेल, कच्छ कडवा पाटीदार युवक मंडळाचे अध्यक्ष राजेश छाभैया, कच्छ वागड लेवा पाटीदार समाजाचे अध्यक्ष जीवाभाई रावत, पाटीदार समाजाचे उपाध्यक्ष जीतुभाई पटेल, सौराष्ट्र लेवा पटेल समाजाचे रमेश सोरठीया, कुनालभाई संघाणी, भानजीभाई पटेल, भाजप सोशल मिडीया सेलच्या सहसंयोजीका बीना गोगरी, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रवीण वेरा यांच्यासह पाटीदार समाजाचे बांधव उपस्थित होते.
Comments
Popular posts
रायगढ़ जिले के पूर्व सैनिकों से संबंधित विभिन्न मुद्दों पर पालक मंत्री भरत गोगावले के साथ बैठक...
Image
नवीन पनवेल परिसरातील जुन्या विहिरींची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी...
Image
गोसेवा आयोगाच्या अध्यक्षांची पनवेल महानगरपालिका कार्यालयाला सदिच्छा भेट...
Image
खांदेश्वरच्या माऊलीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी ; कामोठे,नवीन पनवेल आणि पनवेल मधील दांडियाप्रेमींची गरब्यासाठी उपस्थिती..
Image
नवीन पनवेल प्रभाग १७ मधील खराब रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण करा ; नगरसेवक अ‍ॅड.मनोज भुजबळ यांची महापौर नितीन पाटील यांच्याकडे मागणी...
Image