सन्मान नवदुर्गाचा या उपक्रमांतर्गत शेकापचे कार्याध्यक्ष गौरवभाई पोरवाल यांनी केला विविध विशेषज्ञ महिला डॉक्टरांचा सन्मान..
गौरवभाई पोरवाल यांनी केला विविध विशेषज्ञ महिला डॉक्टरांचा सन्मान

पनवेल वैभव, दि.11 (संजय कदम) ः सन्मान नवदुर्गांचा या उपक्रमअंतर्गत शेतकरी कामगार पक्षाचे कार्याध्यक्ष गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून तसेच मा. आमदार बाळाराम पाटील यांच्या संकल्पनेतून वैद्यकीय क्षेत्रातील विविध विशेषज्ञ महिला डॉक्टर यांचा श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर सेक्टर 18 कामोठे येथे सन्मान करण्यात आला.

यावेळी महिला डॉ. श्रुणाल जाधव, डॉ. पल्लवी भिरुड, डॉ. वैशाली जावडे, डॉ. रुक्मिणी धायगुडे, डॉ. विना काब्रा, डॉ. स्वाती वारे, डॉ. मंजू जायभये, डॉ. प्रांजली अंधारे, डॉ. विजया नलावडे यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला पंडित गोवारी,अल्पेश माने, सुनिल भोपी, रमेश गोरे, कैलाश आंधळे, सचिन झनझने, प्रशांत पवार, सुशांत पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


फोटो ः डॉक्टर सन्मान
Comments