महेश साळुंखे यांची मुक्ती दिनानिमित्त येवला येथे भेट
पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी मुक्ती दिना निमित्त येवला नाशिक येथे उपस्थिती दर्शवली.
त्या ठिकाणी महाराष्ट्रातील आंबेडकर चळवळीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या स्टेजवर महाराष्ट्राचे मराठ्यांचे नेते मनोज जरांगे व राजरत्न आंबेडकर यांची महेश साळुंखे यांनी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी रायगड जिल्हा कार्याध्यक्ष विजय धोत्रे पेण तालुका अध्यक्ष अमित कांबळे ,भारत दाताड व इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ः महेश साळुंखे भेट