राष्ट्रीय लोक अदालतीत ३१५३ प्रकरणे निकाली...
राष्ट्रीय लोक अदालतीत 3,153 प्रकरणे निकाली...
    
पनवेल / वार्ताहर :-
दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या हेतूने आयोजित केलेल्या दि. २८ सप्टेंबर २०२४ पनवेल येथील न्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून वादपूर्व आणि  दाखल अशी  एकूण 3,153 प्रकरणे सामंजस्याने मिटवण्यात यश आले आहे. अशी माहिती मा.जे.डी.वडणे, जिल्हा न्यायाधीश १ तथा अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, पनवेल, रायगड यांनी दिली.

    राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे तसेच एम.एस.ई.बी, बँक फायनान्स, पतपेढी संस्था अशा विविध विभागांकडून आलेली वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. पनवेल येथील जिल्हा न्यायालयात आयोजित केल्या गेलेल्या लोक अदालतीमध्ये वादपुर्व व प्रलंबित अशी एकूण 23,988  प्रकरणे  ठेवण्यात आली होती.  19,289वादपूर्व प्रकरणा पैकी 2,362 आणि 4,699 प्रलंबित खटल्यांपैकी 791 प्रकरणे सामंजस्याने मिटवून लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आली. व त्याद्वारे पक्षकारांना आणि विविध विभागांना एकूण 14 कोटी 45  लाख  63 हजार 948 रुपयांची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली आहे. 

पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. मनोज भुजबळ आणि संपूर्ण कार्यकारणी मंडळ यांचे विशेष सहकार्य मिळाले.

    पनवेल येथील न्यायालयात लोकअदालतीचे ७ कक्ष स्थापन करण्यात आले होते. यासाठी कक्ष प्रमुख म्हणून  श्री. एस. आर.चव्हाण साहेब - जिल्हा न्यायाधीश - ४ व अति. सत्र न्यायाधीश, पनवेल,  श्रीमती एन.पी.पवार, दिवाणी न्यायाधीश व.स्तर पनवेल, श्री. के. एम. सोनवणे, ३रे सह दिवाणी न्यायाधीश व स्तर, पनवेल, श्री.एन.एस.काकडे, ४थे सह दिवाणी न्यायाधीश व स्तर, पनवेल, श्रीमती एस.व्ही.साळवी, ३रे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पनवेल,  श्रीमती पी. सी. बिडकर, ५ वे सह दिवाणी न्यायाधीश, क स्तर, पनवेल,  श्री. डी. एम. वाघमारे, ७वे सह दिवाणी न्यायाधीश, क स्तर, पनवेल यांनी काम पाहिले तसेच पंच म्हणून ॲड. इंद्रजीत भोसले, ॲड. संतोषी चव्हाण, ॲड. सुयश कामेरकर, ॲड. मनीषा गावंडे, ॲड. वैशाली सुळेभावीकार, ॲड. समिना खान, ॲड. सुनिल येंदारकर यांनी काम पाहिले.

लोक अदालती मध्ये पक्षकारांना न्यायालयात येण्याची सक्ती न करता व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून देखील प्रकरणे मिटवण्यात आली.
या लोकन्यायालयाला यशस्वी करण्यासाठी  सर्व न्यायिक अधिकारी, वकील वर्ग , न्यायालयीन कर्मचारी सौ . स्मिता आपटे ,सहा.अधीक्षक - जिल्हा न्यायालय, श्री. अविनाश चंदने, कनिष्ठ  लिपिक आणि श्री.  शैलेश कोंडसकर, विधी स्वयंसेवक, जिल्हा न्यायालय, पनवेल तसेच महानगरपालिका, बँक, पोलीस प्रशासन, इतर शासकीय विभाग आणि सर्व पक्षकार यांनी भरगोस असा प्रतिसाद दिला.  
याबद्दल मा. जे.डी.वडणे, जिल्हा न्यायाधीश १ तथा अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती पनवेल रायगड यांनी सर्वांचे आभार मानले.
Comments
Popular posts
शिबिरात दिलेला शब्द उपचारापर्यंत जपला ; रुग्णांच्या भेटीला प्रितम म्हात्रे...
Image
गणेशोत्सव मंडपात गिरविले ‘सीपीआर’चे धडे ; मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे नागरिकांना सीपीआरचे प्रशिक्षण...
Image
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
रुग्णालयातून घरी गेल्यानंतर उपचारांसाठी मेडिकव्हरचा ‘होमवॉर्ड’ उपक्रम..
Image
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर संस्कृती आणि परंपरेचा उत्सवी रंग ; ढोल-ताशांच्या गजरात अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
Image