टायरसह डिझेल चोरी करणार्‍या दुकलीला पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड..
टायरसह डिझेल चोरी करणार्‍या दुकलीला पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड..


पनवेल, दि.9 (वार्ताहर) ः टायरसह डिझेल चोरी करणार्‍या दुकलीला पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले असून यातील एक गुन्हेगार सराईत असल्याने त्याच्याकडून विविध प्रकारचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पनवेल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओवळे गाव परिसरात एका वाहनाच्या टायरची चोरी झाली होती. या संदर्भात वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.निरीक्षक प्रकाश पवार, सहा.पो.निरीक्षक सुषमा पाटील, पो.उपनिरीक्षक विनोद लभडे, पो.हवा.अमोल पाटील, मिथुन भोसले, महेश पाटील, विशाल दुधे आदींचे पथक सदर आरोपीचा शोध घेत असताना सदर आरोपी हे गव्हाण पाण्याची टाकी परिसरात येणार असल्याची खबर मिळाल्याने या पथकाने आरोपी शेरसिंह गणपतसिंह राठोड (रा.रबाळे) व आमिन निजाम सय्यद (रा.घणसोली) यांना ताब्यात घेतले असता त्यांनी गाडीचे टायर रिंगसह चोरल्याचे कबूल केले. तसेच सदर माल फिरस्ता भंगार विक्रेत्यास विकल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे जेएनपीटी रोडवरील उभ्या असणार्‍या ट्रकमधील डिझेल चोरी केल्याचे कबुल केले आहे. या आरोपींकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

फोटो : संग्रहित
Comments