अभिनव युवक मित्र मंडळाच्या श्री गणेशोत्सव २०२४-२५ अंकाचे झाले प्रकाशन..
मंडळाचे सदस्य,पत्रकार संजय कदम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा ..

पनवेल वैभव, दि.15 (वार्ताहर) ः पनवेल शहरातील पायोनिअर विभागातील 34 वर्ष सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणार्‍या अभिनव युवक मित्र मंडळाच्या श्री गणेशोत्सव 2024-25 या अंकाचे प्रकाशन श्री गणरायाच्या आशिर्वादाने करण्यात आले.
यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष नितीन पाटील व सदस्य संजय कदम यांच्या शुभ हस्ते या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. 
यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजा चव्हाण, उपाध्यक्ष अल्पेश पाडावे, खजिनदार शैलेश कदम, चिटणीस सचिन नाझरे, सुप्रसिद्ध गायक मुकेश उपाध्ये, मयुर चिटणीस, राहुल सावंत, परेश बोरकर, प्रवीण सावंत, रुपेश नागवेकर, सुनील म्हात्रे, प्रकाश लाड, महेश सरदेसाई यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मंडळाचे सदस्य संजय कदम यांचा वाढदिवस सुद्धा साजरा करण्यात आला.

फोटो ः अंकाचे प्रकाशन व वाढदिवस शुभेच्छा
Comments
Popular posts
नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ...
Image
पनवेलमध्ये सौर प्रकल्प निर्मिती व आधुनिक महिला सुविधा केंद्र उभारा - ममता प्रितम म्हात्रे
Image
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image