गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पळस्पे फाटा ते खारपाडा टोलनाका हद्दीतील हॉटेल, ढाबा, लॉज मालकांची घेण्यात आली बैठक..
हॉटेल,ढाबा,लॉज मालकांची घेण्यात आली बैठक..
पनवेल, दि.31 (संजय कदम) ः आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पनवेल तालुक्यातील पळस्पे फाटा ते खारपाडा टोलनाका दरम्यान गोवा रोडलगत असलेले ढाबा, हॉटेल, लॉज मालक-चालक यांची मंथन हॉल, पनवेल या ठिकाणी बैठक घेण्यात आली.
सदर बैठकी दरम्यान  परिमंडळ 2 पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, वाहतूक शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल उबडे, वपोनि नितीन ठाकरे, वपोनि अनिल पाटील यांच्यासह वाहतूकशाखेचे अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,  हॉटेल, ढाबा, लॉजवर उत्सवा दरम्यान रोडवर पार्किंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याकरिता विशेष लोक नेमावेत, गणेशोत्सव करिता कोकणात जाणारे भाविक यांना अपघात अथवा इतर संकट वेळी मदत करावी,  प्रत्येकाने आपल्या हॉटेल समोर येणार्‍या व जाणार्‍या रोड समोर अद्यावत सीसीटीव्ही कॅमेरे लावून घ्यावे. इतर सूचना देऊन उपस्थित हॉटेल चालक-मालक यांचे समस्यांचे निराकरण करण्यात आले.


फोटो ः पोलीस बैठक
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image