पनवेल / प्रतिनिधी : -
यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था तसेच रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचा दरवर्षी दोन रुग्णवाहिका लोकार्पण करण्याचा मानस आहे. त्या अनुषंगाने मागच्या महिन्यात दिघोडे ग्रामपंचायतीसाठी तर खालापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष कृष्णा पारंगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी वासांबे विभागासाठी संस्थेच्या सौजन्याने १४ वी रुग्णवाहिका रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष तथा राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी वासांबे विभागातून मोठ्या संखेने उपस्थित असलेल्या ग्रामस्थानी महेंद्रशेठ घरत यांचे आभार मानले व जनते साठी काम करणारे खरे दानशूर व खरे समाजसेवक महेंद्रशेठ घरत आहेत असे गौरवोद्गार काढले. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या उक्तीप्रमाणे महेंद्रशेठ घरत समजासाठी बोलतात ते करतात असे ग्रामस्थ म्हणाले.
हा कार्यक्रम श्री. कृष्णा गंगाराम पारंगे यांच्या वाढदिवस प्रसंगी रीस येथील निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते श्री. नाना म्हात्रे,खालापूर तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष कृष्णा पारंगे,रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोक मुंडे, रायगड युवक अध्यक्ष निखील डवळे, महिला अध्यक्षा दिप्ती म्हात्रे, माजी सभापती कांचन पारंगे, ग्रामपंचायत सदस्या उर्मिला डवले, विनायक देशमुख, प्रमोद राईळकर, राम कुरुंगले, डॉ. संजय कुरुंगले, मधुकर दळवी, निलेश ठोंबरे, अनंता दळवी, प्रतिप पाटील (सरपंच), श्याम म्हसकर, तसेच मोठ्या संखेने चौक व वासांबे विभागातील ग्रामस्थ उपस्थित होते.