शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या देवद शाखेतर्फे आषाढी एकादशी निमित्त भाविकांना तुळशी रोपांचे वाटप...
आषाढी एकादशी निमित्त तुळशी रोपांचे वाटप...


पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः पनवेल तालुक्यातील देवद गाव येथील श्री विठ्ठल रखुमाई  मंदिरा जवळ आषाढी एकादशी निमित्त तुळस रोपांचे वाटप करण्यात आले.
तुळस ही आरोग्यवर्धक, सुख शांती, आनंदी, प्रदूषण नाशक अशी तुळशीची ओळख आहे. तसेच हिंदू धर्मात तुळशीला फक्त एका रोपाच्या दृष्टीने न पाहता देवाच्या स्थानी मानून पूजा केली जाते. तुळशीला घरात असण्याने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, तर बर्‍याच आजारापासून आपल्याला सुटका देखील मिळते. तसेच आयुर्वेदामध्येही गुणकारी तुळशीचे मोठे योगदान आहे. याचे महत्व लक्षात घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल तालुका संघटक दिपक निकम, विक्रम पाटील यांची उपस्थिती लाभली. शिवसेना युवासेनातर्फे देवद शाखेतील उप विभाग प्रमुख जयंत पाखरे, शाखा प्रमुख सुरेश माने, भिकाजी चव्हाण, बिपिन झुरे, हेमंत म्हात्रे, योगेंद्र यादव, महिला संघटक तनुजा झुरे, अर्चना चव्हाण,ऋतुजा हिर्लेकर, श्रध्दा वायंगणकर, सुजाता सोलकर, मीना यादव, सानिका झुरे यांच्या हस्ते तुळशी रोपांचे वाटप भाविकांना करण्यात आले.


फोटो ः तुळस वाटप
Comments