ऋतिक पाटील यांची रायगड कबड्डी संघाच्या कर्णधार पदी निवड ...
कळंबोली : अलिबाग तालुक्यातील धेरंड गावातील ऋतिक मच्छिंद्र पाटील या अति सर्वसामान्य कुटुंबातील कबड्डीपटू चा रायगड जिल्ह्याच्या कबड्डी संघाच्या कर्णधार पदी निवड करण्यात आलेली आहे .सदरची निवड रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे .त्याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. सद्यस्थितीत ऋतिक पाटील हे पुणे येथील बालेवाडी मध्ये महाराष्ट्राच्या संघांमधून कबड्डीच्या खेळाचे प्रदर्शन करीत आहे.
अलिबाग तालुक्यातील धेरंड गावचे मच्छिमारीचा व्यवसाय करणारे मच्छिंद्र कृष्णा पाटील यांचे सुपुत्र ऋतिक पाटील या कबड्डीपटून आपल्या मेहनतीच्या जोरावर कबड्डी या मैदानी खेळामध्ये आपले कसब पणाला लावले आहे . त्याच्या खेळण्याच्या कर्तबदारीतून त्याची रायगड जिल्ह्याच्या कबड्डी संघाच्या कर्णधार पदी निवड करण्यात आली आहे. अद्याप पर्यंत एकूण १० अंतिम कबड्डीचे सामने जिंकले आहेत तर 17 बक्षिसांची लेणी त्यांनी धेरंड येथील मरीदेवी क्रीडा मंडळासाठी मिळवून दिले आहेत. रायगड जिल्ह्याच्या कर्णधार पदी निवड होतात त्याचे सामाजिक , शैक्षणिक, सांस्कृतिक स्तरातून तसेच धेरंड गावातील मरीदेवी क्रीडा मित्र मंडळच्या वतीने अभिनंदन केले जात आहे.