पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे यांची नियुक्ती...
पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे यांची नियुक्ती...


पनवेल वैभव / प्रतिनिधी  : - 
पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे यांची नियुक्ती नगरविकास विभागाकडून करण्यात आली आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त या पदावर कार्यरत असणारे मंगेश चितळे यांची महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाच्या शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी पनवेल महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 36 नुसार आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. यापूर्वी सुद्धा ते पनवेल नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी कार्यरत होते. तसेच काही कालावधीसाठी त्यांनी पनवेल महानगरपालिकेच्या उपायुक्त पदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यामुळे त्यांना पनवेलच्या राजकीय व भौगोलिक परिस्थितीची पूर्ण माहिती असलेले असे आयुक्त असणार आहेत.
फोटो ः मंगेश चितळे
Comments