कर्जत येथील आदिवासी भागातील पिंपळपाडा शाळेत विद्यार्थ्यांना विविध शालोपयोगी वस्तूंचे वाटप..
सामाजिक बांधीलकी जपत दिशा व्यासपीठाचा उपक्रम, इंदू झा व अमित पाटील यांचे विशेष सहकार्य..


पनवेल / प्रतिनिधी :-
कर्जत जवळ पिंपळपाडा हा आदिवासी भाग आहे या पाड्यातील शाळेत इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत 23 मुले -मुली शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांप्रती सामाजिक बांधिलकी जपून कर्तव्य म्हणून गुरुवार दिनांक 20 जुलै रोजी दिशा व्यासपीठाच्या या नियोजनासोबत नेहमीच समाजभान जपणाऱ्या धीरज स्नेह उपहारच्या इंदू झा व अमित पाटील यांच्या विशेष सहकार्याने प्रत्येकी मुलांना शाळेची बॅग व छत्री चे वाटप करण्यात आले तसेच मुलांना खाऊ ही देण्यात आला.
सामाजिक भान जपणाऱ्या इंदू झा यांनी मुलांना शुभेच्छा देत शिक्षणासाठी कुणाला अडचण येत असेल तर त्या नेहमी मदतीस तत्पर असतील असे आश्वासनही दिले. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धा चे आयोजन करून त्यासाठी लागणारी बक्षिसे व शैक्षणिक साहित्य  दिशा व्यासपीठाकडून पुरवले जाईल अशी ग्वाही दिशा व्यासपीठाच्या उपाध्यक्ष विद्या मोहिते यांनी दिली.
यावेळी दिशा व्यासपीठाच्या संस्थापक निलम आंधळे यांनी मुलांशी संवाद साधल्यानंतर प्रतिकूल परिस्थिवर मात करत उचित ध्येय व जिद्दीच्या जोरावर ही मुलं उद्याच उज्ज्वल भविष्य नक्की घडवतील अशी आशा व्यक्त केली. यावेळी शाळेचे शिक्षक आशिष सर, गावडे सर व दिशा व्यासपीठाच्या रेखा ठाकूर व तनया आंधळे यावेळी उपस्थित होते.
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल दगडी शाळा येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना छत्री व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न...
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
पनवेलला वैभव लाभायचे असेल तर अतिक्रमण पूर्व दक्षता कमिटी स्थापन करावी - शिवसेना सल्लागार रमेश गुडेकर...
Image
पनवेल येथे ECHS पॉलीक्लिनिक स्थापन करण्यासाठी माजी सैनिक संघटनांची मागणी...
Image