पनवेल तक्का परिसरात 45 लाखाच्या गांजासह वाहन जप्त ; दोन आरोपी ताब्यात..
राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.2 पनवेल विभागाने केला तक्का परिसरात 45 लाखाच्या गांजासह वाहन जप्त ; दोन आरोपी ताब्यात


पनवेल, दि.15 (संजय कदम) ः राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.2 पनवेल विभागाने पनवेल जवळील तक्का येथे आज 2 दोन आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्याकडून जवळपास 45 लाखाच्या गांजासह गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त केले आहे.
पनवेल मुंब्रा हायवेच्या डाव्या बाजुस स्टार वेल्डींग समोर, तळोजे पाचनंद, से. नं. 40, तळोजे येथे 2 दिवसापूर्वी 1 कोटी रूपये किमंतीचा जास्त किमंतीचा गांजा हा अंमली पदार्थाचा मोठासाठा व एक चारचाकी एक्सयुव्ही 500 वाहन जप्त केले होते. व दोन आरोपींना अटक केलेली होती. सदर आरोपींना कार्यालयात चौकशीकामी आणले असता आरोपी परवेझ शेख याचे मोबाईलवर एका अनोळखी इसमाचा कॉल आला त्याने अंकल मी पनवेल येथे माल घेऊन आज सायंकाळी 5 ते 6 वाजे दरम्यान ईनोव्हा गाडीने येत आहे असे बोलला सदर इसमाशी राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनी सुध्दा ते अंकलच आहेत असे बोलून त्याला तु सदर माल घेऊन तक्का पनवेल येथे जुना मुंबई-पुणे रोडवर पंचमुखी मारूती मंदिर समोर ये असे बोलले. त्यानुसार बातमीच्या ठिकाणी हनोझ होशी इंगीनीर (इंजिनियर) रा. लोणावळा, व दिवा उंबरे यांना चारचाकी वाहन ईनोव्हाने ते मालासह तक्का पनवेल येथे आले व अलगद पणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सापळयात अडकले. सदर आरोपींच्या ताब्यातून 135 किलो गांजासह एक चारचाकी ईनोव्हा वाहन असा एकुण 45,75,000/-रूपये किमंतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. सदर आरोपी विरूध्द पंचनामा कारवाई नोंद करून एन.डी.पी.एस. अँक्ट कलम 8 (क), 20(ब)(1),29 तसेच भा. द. स. कलम 328 प्रमाणे सह आरोपी म्हणून अटक केली. सदर कारवाई डॉ. विजय सुर्यवंशी (भा. प्र. से.) आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई प्रसाद सुर्वे संचालक (अ. व. द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रदिप पवार उप-आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभाग ठाणे, आर. आर. कोले, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग यांचे मार्गदर्शनाखाली, निरीक्षक आर. डी. पाटणे, निरीक्षक उत्तम आव्हाड, दुय्यम निरीक्षक डी. सी. लाडके, दुय्यम निरीक्षक एन. जी. निकम, दुय्यम निरीक्षक प्रविण माने, दुय्यम निरीक्षक कृष्णा देवरे, दुय्यम निरीक्षक अजित बडदे, दुय्यम निरीक्षक गणेश कुदळे तसेच सहा. दु. नि. जी. सी. पालवे, सखाराम पवार हे सहभागी होते. सदरील गुन्हयाचा पुढील तपास आर. आर. कोले, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. डी. पाटणे हे करत आहेत.



फोटो ः राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image