व्ही के हायस्कूल पनवेल येथे महाआरोग्य शिबिर संपन्न...
व्ही के हायस्कूल पनवेल येथे महाआरोग्य शिबिर संपन्न...

पनवेल / प्रतिनिधी -  : ए बी एन टेक्नॉलॉजी, महामना मालवीय मिशन मुंबई आणि इंटरनॅशनल वैश्य फेडरेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन 25 मे रोजी व्ही के हायस्कूल, पनवेल करण्यात आले. वैश्य वाणी समाज आणि इतरांसाठी पहिल्यांदाच पनवेलमध्ये शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात जवळपास 1 हजार जणांनी लाभ घेतला. 
     पनवेल, ग्रामीण, कळंबोली, खोपोली, खालापूर, पेण, चौक, कर्जत येथून नागरिक शिबिरासाठी आले होते. डॉ. अजय नकाशे, डॉ. श्रद्धा नकाशे, डॉ. निलेश चांडक, टाटा हॉस्पिटल, आर झुनझुनवाला, एच व्ही देसाई आय हॉस्पिटल, सद्गुरू कृपा लॅब आदींनी मेहनत घेऊन शिबिरातील नागरिकांना मोफत सेवा दिली. शिबिरात मोफत कर्करोग चिकित्सा व उपचार, नेत्र तपासणी, चष्मे वाटप, इसीजी, मधुमेह, रक्तदाब, स्त्रीरोग आदींची तपासणी करण्यात आली. विशेष करून कर्करोग होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन तज्ञांकडून करण्यात आले. या शिबिरात कर्करोग बद्दल जनजागृती देखील करण्यात आली. इंटरनॅशनल वैश्य फेडरेशन रायगड, वैश्य सभा मुंबई, पनवेल तालुका वैश्य समाज, वैश्य वाणी- एक हात मदतीचा, पनवेल महिला मंडळ यांनी या महाआरोग्य शिबिरासाठी आयोजक म्हणून काम पाहिले. हे महाआरोग्य शिबिर यशस्वी होण्यासाठी सर्वांनीच मेहनत घेतली.
Comments