सराईत तोतया पोलिसाला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड ; ४ गुन्हे उघडकीस..
सराईत तोतया पोलिसाला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड ; ४ गुन्हे उघडकीस..


पनवेल, दि.8 (संजय कदम) ः पोलीस असल्याची बतावणी करणार्‍या सराईत गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
सुमित्रा रामचंद सोनगार वय 60 राहणार वांवंजे मु. पोस्ट तालुका पनवेल हीस एका इसमाने पोलीस असल्याचे बतावणी करून तसेच जवळच एका घरात घरफोडी झालेली असून सदर गुण्यातला मुद्देमाल तपासायचा आहे तुमचे सोने दाखवा असे सांगून त्यांचे सोने बतावणी करून घेऊन गेला म्हणून सदरचा घटनेवरून पनवेल तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 106/ 24 आयपीसी 420, 170 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याचा तपास पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत, सतीश तांडेल, सोनकांबळे, भीमराव खताळ, किरवे करीत असताना 80 ते 85 सीसीटीव्ही फुटेज बघून वावंजेगाव ते बदलापूर असे रोड लगत सीसीटीव्ही फुटेज याची तपासणी करून त्याचबरोबर जेल रिलीज  यातील आरोपी यांची माहिती घेऊन त्याचे तांत्रिक विश्‍लेषण करून सदर गुन्ह्यांमध्ये विशाल बाळासाहेब सगलगीले (वय-40, रा.बदलापूर) यास ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपी याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केलेले आहे. सदर आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा स्प्लेंडर, पोलिसांचा गणवेश जप्त केला असून त्याच्यावर यापूर्वी खारघर, तळोजा, एनआरआय व पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत करीत आहेेत.
Comments