खांदा कॉलनी, नवीन पनवेल आणि कळंबोली परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याची शेकापची सिडकोकडे मागणी..
पाणी पुरवठा सुरळीत करण्याची शेकापची सिडकोकडे मागणी..
पनवेल दि.२२ (वार्ताहर): खांदा कॉलनी, नवीन पनवेल आणि कळंबोली परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याची शेतकरी कामगार पक्षाने सिडकोचे अधिकारी बी. वी. गायकवाड यांची भेट घेऊन मागणी केली आहे. 
            गेल्या काही दिवसांपासून खांदा कॉलनी, नवीन पनवेल आणि कळंबोली परिसरात सिडकोद्वारे केला जाणारा पाणी पुरवठा पूर्णतः बंद आहे. पाणी पुरवठ्याची पाइपलाइन फुटल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी हा पाणीपुरवठा बंद केला आहे. याबाबत सिडकोने घेतलेल्या शटडाऊनचा वेळ संपून देखील अद्याप पाणीपुरवठा सुरळीत झाला नसल्याने शेकापने याबाबत पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
सिडकोने हाती घेतलेले दुरुस्तीचे काम दि.२० रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत पूर्ण झाले आहे.  २४ तास उलटूनही अद्याप या तीनही ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत नसल्याचा आरोप शेकापचे महादेव वाघमारे यांनी केला आहे. त्यामुळे सोसायट्यांमधील रहिवाशांना स्वखर्चाने टँकरद्वारे पाणी मागवून 'घ्यावे लागत आहे. 
यावेळी सिडकोच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बी. वी. गायकवाड यांची भेट घेऊन शेकाप कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी निवेदन दिले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, परिवर्तन सामाजिक संस्थेचे कार्यालयीन सचिव प्रकाश पाटील उपस्थित होते.



फोटो: पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करताना शेकाप पदाधिकारी
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल दगडी शाळा येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना छत्री व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न...
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
पनवेलला वैभव लाभायचे असेल तर अतिक्रमण पूर्व दक्षता कमिटी स्थापन करावी - शिवसेना सल्लागार रमेश गुडेकर...
Image
पनवेल येथे ECHS पॉलीक्लिनिक स्थापन करण्यासाठी माजी सैनिक संघटनांची मागणी...
Image