शिवसेना सोडून गेलेल्या गद्दारांना धडा शिकवण्याची वेळ आली असून लोकससभा निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांनाच विजयी करा - शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर...
संजोग वाघेरे-पाटील यांनाच विजयी करा - शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर...

पनवेल वैभव / दि.१५ (संजय कदम):   शिवसेना सोडून गेलेल्या गद्दारांना धडा शिकवण्याची वेळ आली असून लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांनाच विजयी करा असे आवाहन आज पनवेल तालुक्यातील नावडे शहर येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी शिवसेना उपनेते, आमदार सचिन अहिर यांनी केले.
             यावेळी शिवसेना उपनेते , आमदार सचिन अहिर यांच्यासह जिल्हा प्रमुख शिरीष घरत, मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, कार्यक्रमाचे आयोजक नावडे विभागीय अध्यक्ष यशवंत खानावकर, शाखा प्रमुख विलास म्हात्रे, विधानसभा संघटक दीपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकुर, तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल, महानगर समन्वयक दिपक घरत, उप महानगर प्रमुख रामदास गोंधळी, युवासेना सह सचिव अवचित राऊत, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका रेवती सकपाळ, विधानसभा संघटिका सुजाता कदम, कामोठे शहर संघटिका संगीत राऊत, संपदा धोंगडे, सीमा पाटील, जयश्री म्हात्रे, शीतल म्हात्रे, सविता म्हात्रे, वर्ष पाटील, शाखा प्रमुख गणेश म्हात्रे, कळंबोली शहर प्रमुख सूर्यकांत म्हसकर, अशोक खानावकर, हरेश पाटील, प्रदीप केणी, विश्वनाथ खानावकर, राम खानावकर, अनंत शेठ म्हात्रे, प्रमोद पाटील, तात्या महानवर, सचिन भोईर, संदीप तांडेल, अक्षय साळुंखे, वासुदेव पाटील, बेंदर पाटील, यांसह परिसरातील पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनी सांगितले की, नावडे हा परिसर विकसित होत असून येथील अडी अडचणी सोडवण्यासाठी शिवसेना बांधील असल्याचे सांगिलते तर मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांनी सांगिलते की, शिवसेनेची शाखा ही न्यायमंदिर असून येथे येणारी प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचे काम येथील  पदाधिकारी करतील असे आश्वासित केले.फोटो: नावडे शिवसेना जनसंपर्क कार्यलयात उदघाटन
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या देवद शाखेतर्फे आषाढी एकादशी निमित्त भाविकांना तुळशी रोपांचे वाटप...
Image