खांदा वसाहतीमध्ये अवेळी व कमी दाबामुळे सोडण्यात येणाऱ्या पाण्या विरोधात शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे)विचारला सिडकोला जाब
शिवसेनेने( उद्धव बाळासाहेब ठाकरे)विचारला सिडकोला जाब 

पनवेल दि. २१ ( संजय कदम  ) : खांदा वसाहतीमध्ये अवेळी व कमी दाबामुळे सोडण्यात येणाऱ्या पाण्या विरोधात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाने सिडकोच्या संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांना आज जाब विचारण्यात आला . 
                       शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे खांदा वसाहतीचे शहर प्रमुख सदानंद शिर्के यांच्या नेत्तृत्वाखाली सहाय्यक कार्यकारी अभियंता कार्यालयातील अधिकारी मस्कर यांची भेट घेऊन खांदा वसाहतीमधील पाणी पुरवठा दिनांक १६ मार्च पासून पुर्णत: बंद आहे. व ज्या ठिकाणी पाणी पुरवठा केला गेला तो अत्यंत कमी दाबाने व कमी कालावधी करण्यात येत आहे. त्यामुळे खांदा वसाहतीमधील रहिवाश्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. सिडको प्रशासनामार्फत करण्यात येणाऱ्या असहकार्याच्या भावनेमुळे व त्यांच्या कडून पुरवल्या  सेवेचा शिवसेनेने निषेध करीत व जर सिडको मार्फत पाण्याची समस्या तात्काळ सोडवली जावी व  खांदा वसाहतीमधील पाणी पुरवठा तात्काळ सुरू करावा अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईल ने आंदोलन छेडेल असा इशारा शहर प्रमुख सदानंद शिर्के यांनी दिला आहे . फोटो - शहर प्रमुख सदानंद शिर्के निवेदन देताना
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र राज्य महामंडळातील संचित तोटा संदर्भात चौकशी करणेबाबत महामाहीम राष्ट्रपतींना निवेदन..
Image
'कमवा आणि शिका' उद्दिष्टाने कमवले “बार काउन्सिल ऑफ़ इंडिया” चे सदस्यत्व आणि 'मास्टर ऑफ लॉ' पदवी ; लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले अभिनंदन व कौतुक
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या देवद शाखेतर्फे आषाढी एकादशी निमित्त भाविकांना तुळशी रोपांचे वाटप...
Image
शिवबंधन बांधून शेकडो महिलांनी केला शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश...
Image