शिवशक्ती मित्र मंडळातर्फे होळी व रंगपंचमी उत्सव विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाने साजरा..
विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाने साजरा


पनवेल, दि.31 (संजय कदम) ः पनवेल शहरातील अनेक वर्षापासून सामाजिक व धार्मिक कायार्र्त अग्रेसर असणार्‍या लाईन आळी येथील शिवशक्ती मित्र मंडळाने यंदाच्या वर्षी सुद्धा होळी व रंगपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात व विविध सांस्कृतिक व धाार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात आला.
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, मार्गदर्शक समाजभूूषण व रायगड रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले रमेश गुडेकर यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष गौरव वेदक, उपाध्यक्ष संदीप पाटील, कायार्र्ध्यक्ष खंडेश धनावडे, कार्याध्यक्ष समीर कदम, कार्याध्यक्ष प्रकाश वाघे, सहकार्याध्यक्ष प्रवीण पोवार, संयुक्त चिटणीस प्रशांत नरसाळे, हिशाोब तपासणीस अरुण ठाकूर, खजिनदार संतोष तळेकर व सहखजिनदार अनिकेत जाधव आदींसह मंडळातील इतर सदस्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही होळी व रंगपंचमी उत्सव तसेच शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्तााने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षिस समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. तसेच कार्यक्रमानिमित्त सत्यनारायणाची महापूूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाचे मार्गदर्शक रमेश गुडेकर यांनी यानिमित्ताने उभारलेल्या विनम्र अभिवादन फलकाचे कौतुक पनवेलकरांनी केले.फोटो ः शिवशक्ती मित्र मंडळ कार्यक्रम
Comments