पनवेल तालुका पोलिसांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑल आउट ऑपरेशन मोहीम ; बेकायदेशीर व्यवसायांवर कारवाई
     बेकायदेशीर व्यवसायांवर कारवाई  ..

पनवेल दि,२३(संजय कदम) : पनवेल तालुका पोलिसांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  कार्यक्षेत्रात ऑल आउट ऑपरेशन मोहीम पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2 चे विवेक पानसरे, सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल विभाग चे अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील व पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यांनी विविध परिसरात जाऊन राबविली. यावेळी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर व्यवसायावर कारवाई करण्यात आली.       
              
 त्यामध्ये प्रामुख्याने अंमली पदार्थ विरूद्ध कारवाई करताना   02 आरोपी अटक करण्यात आले असून त्यापैकी  एका महिला आरोपीचे घरझडती मध्ये 48,840/- रू. किमतीचा 2.396 कि.ग्रॅ कोरडा गांजा जप्त करण्यात आला आहे. तसेच  अंमली पदार्थाचे सेवन करणारे 02 इसमांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे भारतीय हत्यार कायदा 3(25) प्रमाणे एक गावठी पिस्तुल व 05 जिवंत राऊंड जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे. तसेच भारतीय हत्यार कायदा क -4 (25) प्रमाणे एक लोखंडी धारधार घातक शस्त्र जप्त करण्यात आले आहे.  महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65(ई) अन्वये एकूण 11 गुन्हे दाखल करून देशी, विदेशी व हातभट्टी दारू (विनापरवाना विक्री) जप्त करण्यात आली आहे. परिसरातील  हिस्ट्रीशिटर,  गुंडा चेकिंग करण्यात आली यात 03 जण मिळून आले.  पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 02 ठिकाणी नाकाबंदी करून कारवाई करण्यात आली होती. सदर ऑल आऊट ऑपरेशन करिता पनवेल तालुका पोलीस ठाणे कडील 02 पोनि, 06 सपोनि/ पोउपनि, 44 पोलीस अंमलदार हजर होते. अशी माहिती पनवेल तालुका पो. ठाणे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली.  



फोटो -  बेकायदेशीर व्यवसायावर कारवाई
Comments
Popular posts
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image
स्वीकृत नगरसेवक पदी प्रथमेश सोमण यांच्या नावावर शिक्कामोर्तब...
Image