पनवेल तालुक्यातील सुकापुर येथील शेकडो महिलांचा शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर पक्ष प्रवेश
शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे)पक्षात जाहीर पक्ष प्रवेश


पनवेल वैभव वृत्तसेवा :-
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख व शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्यातील सूकापुर ग्रामीण भागातील शेकडो महिलांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी महिला आघाडीच्या पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

यावेळी महानगर समन्वयक दिपक घरत, महिला आघाडीच्या जिल्हा संघटीका कल्पना पाटील, उपजिल्हा संघटीका रेवती सकपाळ, तनुजा झुरे, विचुंबे उपविभाग प्रमुख जयंत पाखरे, विभाग प्रमुख बिपिन झुरे, आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
Comments