लोकसभा व सणासुदीच्या निमित्ताने केलेल्या नाकाबंदी स्पेशल कारवाईत मोटारसायकल स्वारांकडून २१,९००/- रुपये दंड वसूल
मोटारसायकल स्वारांकडून २१९००/- ₹ दंड वसूल 


पनवेल दि . २६ ( संजय कदम ) :  लोकसभा व सणासुदीच्या निमित्ताने पनवेल शहर पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी स्पेशल कारवाईत मोटारसायकल स्वारांकडून एकूण 21,900 /- रुपये दंड वसूली करण्यात आली आहे . 
                      पनवेल शहर पोलीस ठाण्याचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांच्यासह पोलिसांची पथके व वाहतूक शाखेचे पथक आदींची वडाळे तलाव या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती, सदर नाकाबंदी दरम्यान  पोलीस अंमलदार संतोष कोळंबेकर यांनी वडाळे तलाव परिसरातील नंबर प्लेट नसलेले, मुळ सायलेन्सर मध्ये बदल  केलेले, वाहन चालवण्याचा परवाना नसलेले, धोकादायक रीतीने वाहन चालवणारे  दुचाकी गाडी क्रमांक MH47BE2811, MH43BJ0569, MH46CC6118 MH46CJ0947 या दुचाकी वाहनांना पोलीस ठाणे येथे आणून मोटर कायदा कलम प्रमाणे कारवाई करून एकूण 21,900 /- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सदर कारवाई मध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंबादास कांबळे , सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय धारेराव, पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार दत्तात्रय शिंदे , पोलीस नाईक किरण सोनवणे आदी उपस्थितीत होते .
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image