नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील उपायुक्त पदाचा विवेक पानसरे यांनी स्वीकारला पदभार...
परीमंडळ २ च्या पो.उपायुक्तपदी विवेक पानसरे 


पनवेल वैभव / दि.०६ (संजय कदम):   नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परीमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त पदाचा विवेक पानसरे यांनी आज पदभार स्वीकारला आहे.
              आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या गेल्या काही दिवसांमध्ये करण्यात आल्या. त्यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परीमंडळ १ मध्ये कार्यरत असणारे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांची बदली नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परीमंडळ २ येथे करण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी आज आपल्या पदाचा पदभार पनवेल येथे येऊन स्वीकारला आहे. तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परीमंडळ २ चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांची बदली नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परीमंडळ १ येथे करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी पदभार स्वीकारल्या नंतर त्वरित सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बैठक घेऊन येथील गुन्हेगारी, राजकीय व इतर विषयांतील दाखल होणाऱ्या गुन्ह्यांसंदर्भात आढावा घेतला आहे.विवेक पानसरे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परीमंडळ १ येथे आपल्या कामाचा चांगलाच ठसा उमटवीत मोठं मोठ्या गुन्ह्यांची उकल त्यांच्या कार्यकाळात झाली असल्याने व अत्यंत शिस्तप्रिय व्यक्तिमत्व असल्याने आगामी होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये परीमंडळ २ येथे सुद्धा ते आपल्या कामाचा ठसा उमटवतील अशी नागरिकांची आशा आहे. 


फोटो: विवेक पानसरे
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image