किराणा दुकानासह बेकायदा देशीदारू विक्री करणाऱ्या महिले विरोधात पनवेल तालुका पोलिसांची कारवाई.
    पनवेल तालुका पोलिसांची कारवाई....


पनवेल दि.१८(संजय कदम): पनवेल तालुक्यातील कल्हे गाव तसेच नेरे गाव या ठिकाणी किराणा दुकानासह बेकायदा देशीदारू विक्रीकरणाऱ्या एका महिले विरोधात पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. 
              तालुक्यातील कल्हे गावातील एका किराणा दुकानात बेकायदेशीररीत्या देशी विदेशी दारू विक्री केली जात असल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून जवळपास १२०० रुपये किमतीचा देशी विदेशी मद्यसाठा हस्तगत केला आहे. तर दुसऱ्या घटनेत तालुक्यातील नरे गाव येथे एक महिला तिच्या घराजवळून बेकायदेशीररित्या देशी दारूची विक्री करण्यासाठी जवळपास ७३५ रुपयाच्या देशी दारूच्या बाटल्या बाळगल्या प्रकरणी तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ...
Image
पनवेलमध्ये सौर प्रकल्प निर्मिती व आधुनिक महिला सुविधा केंद्र उभारा - ममता प्रितम म्हात्रे
Image
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image