दिवाळीच्या सणानिमित्त ओरायन मॉलने दिली ग्राहकांना अनोखी भेट- सुप्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर...
     सुप्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर...


पनवेल दि.१६(संजय कदम): दिवाळीच्या सणानिमित्त ओरायन मॉल मध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अत्यंत महागडी अशी बक्षिसे देऊन दिवाळीची अनोखी भेट दिली आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अश्या रात्री खेळ चाले या मालिकेत शेवंताची भूमिका करणाऱ्या अपूर्वा नेमळेकर यांनी विजेत्या ग्राहकांना बक्षीस देताना केले. 
      यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर यांच्यासह ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर, दिलीपभाई करेलिया, मनन परुळेकर यांच्यासह ओरायन मॉलचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी ओरायन मॉलचे कौतुक करताना अपूर्व नेमळेकर यांनी सांगितले की, नामांकित कंपन्यांचे आऊटलेट येहे ग्राहकांना खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहेत त्यामुळे त्यांना वाशी किंवा मुंबईला खरेदी करण्यासाठी जाण्याची गरज नाही. मंगेश परुळेकर व त्यांची टीम वर्षभर ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर, स्कीम राबवत असतात  मी अनेक मॉल   पहिले पण हा एक वेगळ्या धाटणीचा मॉल आहे. येथे ग्राहक आल्यावर तो रिकाम्या हाताने परत जात नाही हि यांची खासीयत असल्याचे त्यांनी सांगितले. यानिमित्ताने त्यांच्या हस्ते शॉप अँड विन कॉन्टेस्टचा लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यामध्ये प्रथम पारितोषिक होंडा कंपनीची बाईक तुषार याला देण्यात आली तर द्वितीय आय फोन प्रो १५ बालटू यादव याला मिळाले तर तृतीय पारितोषिक अँपल वॉच स्वराज (कर्जत) याला मिळाले आहे. त्याचबरोबर यावर्षी विक्रम लँडर येथे हुबेहूब साकारण्यात आले होते. हे पाहण्यासाठी पनवेलकरांनी मोठी गर्दी केली होती. 



फोटो: ओरायन मॉल शॉप अँड विन
Comments
Popular posts
नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ...
Image
पनवेलमध्ये सौर प्रकल्प निर्मिती व आधुनिक महिला सुविधा केंद्र उभारा - ममता प्रितम म्हात्रे
Image
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image