धावपळीच्या युगात आरोग्याची काळजी घ्या - गणेश कडू

सानवी न्यूट्रिशन अँड मसाज थेरपी सेंटरचे उद्घाटन ...



पनवेल / वार्ताहर : -  आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगामध्ये आरोग्याची काळजी घ्या असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगराचे सरचिटणीस व माजी नगरसेवक गणेश कडू यांनी केले आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर पनवेल शहरातील 360 फिटनेस झोनच्या सानवी न्यूट्रिशन अँड मेल मसाज थेरपी सेंटरचे उद्घाटन गणेश कडू यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी त्यांनी हे आवाहन केले.


याप्रसंगी जिम ओनर सुदेश संजीवन देवघरकर, जिम ट्रेनर जतिन वानखडे,जिम ट्रेनर प्रतीक कदम,जिम रिसेप्शनिस्ट कावेरी कांबळे,जिमचे रवी मामा, मसाज तज्ञ अनिल बर्मा,उन्नती हॉस्पिटलचे डॉ.समाधान पाटील भाटिया विद्यालयातील शिक्षक सचिन आंग्रे,आयटी पार्क
सुधीर पांचाळ,क्राईम ब्रांच ऑफिसर रणजीत पाटील, शिल्पा गणेश कडू,नेहा सुरेश देवघरकर,जनिमा नेओमी आदी उपस्थित होते.

आपल्या शरीराची काळजी ही आपण घेतली पाहिजे.आज लहान मुलांना सुद्धा हृदय विकाराचा त्रास होत आहे. शरीर फिट ठेवण्यासाठी आज फिटनेस झोनची गरज असल्याचे माजी नगरसेवक गणेश कडू यांनी सांगितले. यावेळीअद्यावतपणे उभारण्यात आलेल्या 360 फिटनेस झोनची गणेश कडू यांनी पहाणी केली. मान्यवरांचे स्वागत जिम ओनर सुदेश संजीवन यांनी केले.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image