शिवसेना महानगर प्रमुख प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या प्रयत्नामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णाचे बिल झाले कमी...
 उपचार घेणाऱ्या रुग्णाचे बिल झाले कमी...

पनवेल दि.१८(संजय कदम): प्राचीन हॉस्पिटल मध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णाचे आलेले बिल शिवसेना महानगर शिवसेना महानगर प्रमुख प्रथमेश सोमण यांच्या प्रयत्नामुळे कमी झाल्याने त्या कुटुंबीयांनी शिवसेनेसह प्रथमेश सोमण यांचे आभार मानले आहेत.  
शहरातील प्राचीन हॉस्पिटलमध्ये एक मुलगा डेंगू मुळे आजारी होता त्याला 3,24950 बिल झालं होतं. याबाबत त्यांनी पनवेल शहर समनव्यक वैद्यकीय कक्ष प्रमुख तोफिक बागवान यांना सांगितले. त्यांनतर त्यांनी तत्परतेने ही गोष्ट महानगर प्रमुख प्रथमेश सोमण यांच्या कानी घातली. त्यानुसार त्यांनी त्वरित रुग्णालयांचे विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी रायगड जिल्हा वैद्यकीय कक्ष प्रमुख  चैतन्य पाटील, महानगर प्रमुख वैद्यकीय कक्ष प्रमुख अर्जुन परदेशी, पनवेल तालुका समनव्यक वैद्यकीय कक्ष प्रमुख अभिजीत कोरपे या सर्वांच्या प्रयत्नाने व प्रथमेश सोमण यांच्या पाठपुराव्याने व डॉक्टरांच्या सहकार्याने ४० हजार रुपयांचे बिल कमी करण्यात आले आहे. त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.फोटो: प्राचीन हॉस्पिटल
Comments