गतिरोधकास झेब्रा लाईन व डिव्हायडरला कलर मारण्याची शिवसेनेच्या मागणीची महापालिकेने केली पूर्तता....
शिवसेनेच्या मागणीची महापालिकेने केली पूर्तता....


पनवेल दि.१८(संजय कदम): पनवेल मधील हायवे ते पनवेल रेल्वे स्टेशन रोडवरील गतिरोधकास झेब्रा लाईन आणि डिव्हायडरला कलर मारण्याची शिवसेनेने मागणी केली होती. या मागणीची महापालिकेने तत्परतेने दाखल घेत प्रत्यक्ष कमला सुरवात केली आहे. 
पनवेल हायवे ते पनवेल रेल्वे स्टेशन रोड मधील रस्त्याच्या मधील डिव्हायडर ला कलर मारण्यात यावे तसेच गतिरोधक ला झेब्रा लाईन मारण्यात यावे अशी मागणी महानगर प्रमुख मा.नगरसेवक प्रथमेश सोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनांवणे यांच्या प्रयत्नाने प्रसिद्धी प्रमुख पनवेल शहर तोफिक अब्दुल बागवान यांनी पनवेल महानगर पालिकेला पत्र लिहून केली होती. या मागणीची पनवेल महापालिकेने दाखल घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याने तोफिक अब्दुल बागवान यांनी महापालिकेचे आभार मानले आहेत. 



फोटो: प्रत्यक्ष कामाला सुरुवात
Comments