पनवेल ते कळंबोली दरम्यान मालगाडीचे डब्बे घसरले ; एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम..
 एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम..


पनवेल वैभव /दि.३०(संजय कदम): पनवेल जवळ एक मालगाडी रुळावरून खाली घसरल्याची घटना आज घडली आहे ही घटना कळंबोली ते पनवेल या स्टेशनच्या दरम्यान घडली असून ही ट्रेन पनवेलहून वसईकडे निघाली होती. यावेळी हा अपघात झाला आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोण्हीती जीवित हानी झाली नसली तरी मालगाडीचे ५ ते ६ बोग्या रुळावरून खाली उतरल्यामुळे एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होणार आहे.
      पनवेल जवळ झालेल्या या मालगाडीच्या अपघातामुळे पनवेलच्या दिशेने जाणारी एक्सप्रेसची वाहतूक मात्र ठप्प आहे. या रेल्वे अपघाताचा उपनगरीय सेवेला कोणताही फटका बसलेला नसून ही सेवा सुरळीत पाने सुरु आहे. या मालगाडीमध्ये लोखंडी कॉईल असल्याने ते बाजूला काढून डब्बे पुन्हा रुळावर आणण्याचे मोठे आवाहन रेल्वे प्रशासनासमोर आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी घटना स्थळी पोहचले 




फोटो: मालगाडी अपघात
Comments
Popular posts
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image
स्वीकृत नगरसेवक पदी प्रथमेश सोमण यांच्या नावावर शिक्कामोर्तब...
Image