पनवेल येथील परदेशी आळीतील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे खा.बारणे यांच्या उपस्थितीत लोकार्पण .....


शहर प्रमुख प्रसाद सोनावणे यांचा पुढाकार...

पनवेल / प्रतिनिधी :- 
शिवसेनेचे मावळचे संसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या स्थानिक विकास निधीतून शिवसेना पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे यांच्या पाठपुराव्याने परदेशी आळी येथील अष्टविनायक कॉलनी कडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण होऊन खा. श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत महानगरप्रमुख अॅड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण, रायगड जिल्हा सल्लागार रमेश दादा गूडेकर व महेश सावंत यांच्या हस्ते रस्त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. 
तसेच अशा प्रकारच्या विविध विकासकामांसाठी शिवसेना प्रयत्नशील राहील असा विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला. बरेच वर्ष दुर्लक्षित असलेल्या रस्त्याच्या कामासाठी निधी देऊन काम पूर्ण करून दिल्याबद्दल स्थानिक रहिवाशांनी खासदार बारणे यांचे आभार मानले. तसेच परदेशी आळी येथील प्रसिद्ध असलेले प्राचीन भोईर (धुमाळ) अस्थानात जाऊन मनोभावे दर्शन घेतले.
सदर प्रसंगी शहर संघटक अभिजीत साखरे, उपशहरप्रमुख अर्जुन परदेशी, प्रसिद्धी प्रमुख तौफिक बागवान, प्रभाग 14 विभागप्रमुख आशिष पनवेलकर, शाखाप्रमुख अविनाश साफल्य, किरण पवार, प्रतीक वाजेकर, रोहित भोईर, युवासेना प्रभाग 18 विभागप्रमुख चिन्मय सोनावणे, प्रभाग 14 विभागप्रमुख रितेश पनवेलकर, शाखाप्रमुख अनिकेत जैस्वाल, ओमकार पनवेलकर व स्थानिक रहिवासी संजय पाटकर, मयुरेश पाटकर, विजय पाटील, सदानंद सोमण, अनिरुद्ध भातखंडे आदी उपस्थित होते.
Comments
Popular posts
लिफ्टमध्ये अडकलेल्या ४ तरुण-तरुणींची अग्निशमन दलाकडून सुटका...
Image
राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत पदकांची कमाई ...
Image
महिलेची हत्या करण्यामध्ये आरोपीसोबत सहभागी असलेल्या प्रेमिकेस गुन्ह्यातील गाडीसह घेतले ताब्यात...
Image
भाजपा नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप पनवेल दक्षिण मंडळाची नियोजन बैठक संपन्न..
Image
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तळोजे येथे भव्य वृक्षारोपण अभियान ; शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Image