अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या नायजेरियन इसमाला पनवेल शहर पोलिसांनी केली अटक...
पनवेल शहर पोलिसांनी केली अटक...


पनवेल दि.०४ (संजय कदम) : अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यासाठी आलेल्या एका नायजेरियन इसमाला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून ३ लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थासह इतर मुद्देमाल जप्त केले आहे.   
           पनवेल शहरातील साईनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ओपन जिम जवळ एक नायजेरियन इसम मेथॅक्यूलान (MD) हा अंमली विक्री करता येणार असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान व पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून विक्री करणाऱ्या करता आलेला एक नायजेरियन इसम अगू पास्कल उर्फ केलेची ओंलमा (वय 24 वर्ष) व खरेदी करता आलेला एक इसम शहाबाज फिरोज एलुकर (वय 29) वर्ष यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता नायजेरियन इसमकडे 27 ग्रॅम MD हा अंमली पदार्थ मिळून आला. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्ट कलम 8 (क), 22 (ब), 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्हीही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
'शौर्यम दिवस' के मौके पर 'शौर्यम ट्रिब्यूट बाइक राइड' का आयोजन...
Image
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखेंची पेणमध्ये सदिच्छा भेट ; बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाला उपस्थिती
Image
हृदयाच्या आरोग्यासाठी खारघरमध्ये 'वॉकेथॉन' ; जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा उपक्रम...
Image
उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत क्रीडांगण उभारण्याची मागणी ; नगरसेवक ऍड.मनोज भुजबळ यांचे महापौरांना निवेदन
Image