शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे खेळाडूंना आर्थिक मदत...
शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे खेळाडूंना आर्थिक मदत... 


पनवेल दि.२० (संजय कदम) : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण मंत्रा प्रमाणे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपले काम जोमाने करत आहे. त्याअंतर्गत आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कळंबोली शहर विभागप्रमुख महेश गुरव यांच्या तर्फे राऊंडनेट बॉल राष्ट्रीय स्पर्धा यामध्ये निवड झालेले दोन खेळाडूंना आर्थिक मदत करण्यात आली. 
              हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राजकारणाबरोबर समाजकारणातही अग्रेसर आहे. पक्षाच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण धोरणानुसार आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कळंबोली शहर महेश गुरव विभागप्रमुख यांच्या तर्फे राऊंडनेट बॉल राष्ट्रीय स्पर्धा यामध्ये निवड झालेले दोन खेळाडूंना आर्थिक मदत करण्यात आली. कळंबोली शहर प्रमुख सुर्यकांत म्हसकर आणि विभागप्रमुख कपिल जमदाडे, विभागप्रमुख रजनीश पंडित, उपविभागप्रमुख तुषार निढाळकर यांच्या हस्ते या खेळाडूंना मदत देण्यात आली. यावेळी खेळाडूंनी मदतीबद्दल शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मान्यवरांचे आभार मानले. 
 फोटो : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे खेळाडूंना आर्थिक मदत
Comments